Home > रिपोर्ट > महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन

महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन

महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन
X

आता केडीएमसीद्वारा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळा, रुग्णालये, महापालिका कार्यालये, प्रभाग कार्यालयांत महिलांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन बसविल्या जाणार आहेत. एक कोटी रुपये खर्चून एकूण १७५ ठिकाणी मशीन बसविण्याच्या प्रस्तावाला सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.

महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने हा प्रस्ताव तयार केला होता. याबाबत काही निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका निविदाधारकास काम देण्याचा निर्णयावर स्थायी समिती सभेत मंजुरी दिली गेली. त्यानुसार आता महापालिकेच्या ६९ शाळा, महापालिकेचे मुख्यालय, डोंबिवली विभागीय कार्यालय, १० प्रभाग कार्यालये, १३ नागरी आरोग्य केंद्रे आणि रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालय, अशा एकूण १७५ ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन बसविले जाणार आहे.

Updated : 12 Nov 2019 5:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top