Home > रिपोर्ट > सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत...

सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत...

सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत...
X

मलेशिया मास्टर्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने वर्चस्वपूर्ण कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. सिंधूने जपानच्या अया ओहोरीचा २१-१०, २१-१५ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. हा तिचा सलग नववा विजय ठरला. तर सायनाने दक्षिण कोरियाच्या आठव्या नंबरच्या अ‍ॅन सी यंगचा २५-२३, २१-१२ असा पराभव केला आहे. मात्र यामध्ये समीर वर्मा आणि एच. एस. प्रणॉय यांच्या पराभवांमुळे भारताचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले असून सायना, सिंधू अव्वल आहेत.

Updated : 10 Jan 2020 7:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top