Home > रिपोर्ट > फडणवीसांना पंकजा मुंडेकडून ‘ही’ गोष्ट शिकण्याचा टोला

फडणवीसांना पंकजा मुंडेकडून ‘ही’ गोष्ट शिकण्याचा टोला

फडणवीसांना पंकजा मुंडेकडून ‘ही’ गोष्ट शिकण्याचा टोला
X

राज्यातील ऊसतोड कामगारांचा आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचेही आभार व्यक्त केले. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपल्या सहकारी भगिनीकडून संकटकाळात राजकारण करु नये हे शिकलं पाहिजे असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्य़ा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या...

गेल्या २० ते २२ दिवसांपासून पंकजा मुंडे सातत्याने ऊसतोड कामगारांच्या समस्या मांडत होत्या. सोबतच त्यांना लवकरात लवकर आपल्या मुळ गावी जाण्याची व्यवस्था सरकारने करावी अशी मागणी त्यांनी लावून धरली होती अखेर काल त्या मागणीला यश मिळालं. यानंतर त्य़ांनी शरद पवांरांचे आभारही मानले.

ही संधी साधत रुपाली चाकणकर यांनी “कोरोना सारख्या कठीण परिस्थितीत जनतेची काळजी महाविकास आघाडी सरकार हे उत्तम प्रकारे घेत आहेच, हे जनतेनेही मान्य केले आहे,ऊसतोड कामगारांच्या बाबत "महाविकासआघाडी"ने घेतलेल्या निर्णयाबद्दल पंकजा मुंडे आपण आदरणीय शरद पवार साहेबांचे आभार मानले आहेत,याचा आनंद आहेच..

ही वेळ महाराष्ट्राच्या जनतेला धीर देण्याची, साथ देण्याची आहे..राजकारण करण्याची नव्हे हे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या सहकारी भगिनीकडून नक्की शिकायला पाहिजे” असा टोला ट्वीटर च्या माध्यमातून लगावला आहे.

यापुर्वी अशाच पद्धतीने राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनीही पंकजा मुंडे यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामाची प्रशंसा करण्य़ावरुन देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावण्याची संधी साधली होती.

दरम्यान, राज्य सरकारने साखर कारखाना प्रशासनाला ऊसतोड कामगारांना आपल्या गावी जाण्याची सोय करावी असा आदेश देण्यात आला आहे. ऊसतोड कामगारांना (Sugarcane Worker) त्यांच्या घरी सोडण्यासाठी संबंधित कारखाना प्रशासनाने संबंधित जिल्हाधिकारी, त्या त्या गटाचे मुकादम व मजुरांच्या संबंधित गावचे सरपंच यांच्याशी समन्वय साधून मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या जनावरांसहित सुखरूप त्यांच्या गावी पोहोचविणण्याचा बंदोबस्त करावा, असे या आदेशात म्हटले आहे.

Updated : 18 April 2020 4:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top