Home > रिपोर्ट > कोरोनाशी लढायला रोहित पवारांनी दिली यशोमती ठाकूर यांना 'ही' कल्पना

कोरोनाशी लढायला रोहित पवारांनी दिली यशोमती ठाकूर यांना 'ही' कल्पना

कोरोनाशी लढायला रोहित पवारांनी दिली यशोमती ठाकूर यांना ही कल्पना
X

राज्यात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येसोबत लोकांमधील दहशतीचं प्रमाणही वाढत आहे. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर अधिकाधिक केला जातोय. मात्र, सद्यस्थितीला बाजारात मास्कचा तुटवडा भासत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महिला बचतगटांच्या मदतीने मास्कचा तुटवडा कमी करण्याच्या मार्गावर अंमलबजावणी करण्याची विनंती महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना केली आहे.

“महिला बचत गटांच्या मदतीने आपण मास्कचा तुटवडा कमी करु शकतो. त्याची सुरवात मी केलीय. महिला व बालकल्याणमंत्री यशोमतीताई आपण नेहमीच महिलांच्या हिताची भूमिका घेत आला आहात. याकडेही लक्ष दिल्यास मास्कचा तुटवडाही भासणार नाही व महिला सक्षमीकणाचं आपलं उद्दिष्टही सफल होईल.” अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

Updated : 21 March 2020 9:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top