‘आता कंगनाकडून कोणत्याही संवेदनशीलतेची अपेक्षा नाही’ रेणुका शहाणे भडकल्या
X
अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर अभिनेत्री रेणुका शहाणे सुरुवातीपासूनंच त्यांच मत व्यक्त करत आहेत. मात्र त्यांना आता असं वाटू लागलं आहे की आता जे काही सुरु आहे आणि जे काही वादविवाद होतायेत त्याचा सुशांतच्या केसशी काहीच संबंध नाहीये. या प्रकरणावर रेणुका यांनी कंगना रनौतवर देखील टिका केली आहे.
एका मुलाखतीत बोलताना रेणुका म्हणाल्या की सुशांतचं प्रकरण तेव्हाच मागे पडलं जेव्हा कंगना रणौतने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केलं आणि मुंबईची तुलना पीओकेशी केली. या सर्व मुद्द्यांचा सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणाशी काहीही संबंधीत नाहीत. रेणुका असेही म्हणाल्या की सुशांतच्या विषयावर कंगनाची पहिली प्रतिक्रिया अशी होती की या सर्व गोष्टी घराणेशाहीमुळे झाल्या आहेत.
उर्मिला मातोंडकरवरील कंगनाच्या विधानावरही रेणुका शहाणे यांनी कडक टीका केली. कंगनाने उर्मिलाला 'सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री' म्हटलं होतं. यावर रेणुका म्हणाल्या की, कंगनाने सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या सर्व निरर्थक गोष्टी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली बोलल्या जात आहेत. आता कंगनाकडून कोणत्याही संवेदनशीलतेची अपेक्षा नाही. असं रेणुका यांनी म्हटलं आहे.