Home > रिपोर्ट > दहशतवाद्यांनो, आत्मसमर्पण करा! पोलीस अधिकारी अनिता शर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल

दहशतवाद्यांनो, आत्मसमर्पण करा! पोलीस अधिकारी अनिता शर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल

दहशतवाद्यांनो, आत्मसमर्पण करा! पोलीस अधिकारी अनिता शर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल
X

जम्मू आणि काश्मिरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. यावेळी महिला पोलीस अधिकारी अनिता शर्मा यांनी दहशतवाद्यांना आत्मसर्पण करण्यासाठी प्रोतसाहीत करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. रामबन भागातील बटोलमध्ये साध्या गणवेषात आलेले दहशतवादी एका घरात शिरले होते. त्या कुटुंबातील सहा जणांना या दहशतवाद्यांनी वेठीस ठेवले होते.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अन्य सुरक्षा दलाच्या जवानांनी घराला घेरले. ओसामा, आम्ही तुम्हाला १५ मिनिटांची वेळ देतोय, तुम्हाला बोलायला संधी देऊ असं म्हणत अनिता शर्मा यांनी दहशतवाद्यांना शस्त्रांसोबत बाहेर येण्यास सांगितलं. काही वेळानं त्यांनी शेवटची वॉर वॉर्निंग दिली. मात्र, दहशतवाद्य़ांनी त्यांचं ऐकलं नाही. यानंतर जवानांनी केलेल्या कारवाईत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आणि ओठीस ठेवलेल्या सहा जणांची सुटका करण्यात आली.

Updated : 29 Sept 2019 9:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top