Home > Max Woman Blog > उन्मत सत्ताधाऱ्यांना महिलांवरील अत्याचार दिसत नाहीत का?- प्रविण दरेकर

उन्मत सत्ताधाऱ्यांना महिलांवरील अत्याचार दिसत नाहीत का?- प्रविण दरेकर

उन्मत सत्ताधाऱ्यांना महिलांवरील अत्याचार दिसत नाहीत का?- प्रविण दरेकर
X

2020 या वर्षाची सुरूवातच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या बातम्यांनी झाली. राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीला महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवता आलं नाही. या संदर्भात मी सातत्याने विधानपरिषदेत आवाज उठवला. जेव्हा जेव्हा महिला अत्याचाराच्या घटना कानावर येतात तेव्हा मन अस्वस्थ होतं. राहून राहून मनात प्रश्न येतो, कुठे चाललाय आपला समाज. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा सांगणारा, अनेक समाजसुधारकांना जन्म देणारा हा महाराष्ट्र नक्की कुठे चाललाय. सत्ता मिळताच उन्मत्त झालेल्या सत्ताधाऱ्यांना महिलांवरील अत्याचार दिसत नाहीत का..?

8 मार्च, महिला दिनाच्या निमित्ताने जगभर महिलांच्या हक्कांच्या लढायांचं स्मरण केलं जातं. महाराष्ट्र ही शूरवीरांची भूमी. या भूमीला ज्वाज्वल्ल्य इतिहास देणाऱ्या शिवबांना आई जीजाईंनी घडवलं. सावित्रीबाई, फातिमा शेख यांनी शिकवलं ही परंपरा आज राज्यातील महिला पुढे घेऊन जात आहेत. राज्यात सर्वाधिक महिला आमदार भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या आहेत. महिलांचं खऱ्या अर्थाने सक्षमीकरण हा कृतीचा विषय आहे, गप्पा मारण्याचा नाही हे आमचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमितजी शाह, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी कार्यरत आहे.

महिला उद्योजिकांना कर्जपुरवठा, त्यांना भाग-भांडवल उभं करून देण्यासाठी मदत असो की त्यांना बाजारपेठा मिळवून देण्यासाठीची धडपड. शक्य तितकं काम या क्षेत्रात उभं करण्याचा मी प्रयत्न केला आहे. महिला शिकली, सक्षम झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली की समाजाची प्रगती होते. या प्रवासात तिला समान वागणूक आणि संधी मिळावी म्हणून आपणही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. महिला सक्षमीकरणाच्या कामातला आपापला वाटा आपण सर्वांनी उचलला पाहिजे.

सर्वांना महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा

प्रविण दरेकर

विरोधी पक्षनेता,

महाराष्ट्र विधानपरिषद

Updated : 9 March 2020 2:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top