Positive News : कोरोना च्या दहशतीत मुंबईकरांसाठी सुखद वार्ता
Max Woman | 18 April 2020 8:26 PM IST
X
X
कोरोना व्हायरसची टांगती तलवार मुंबईकरांच्या डोक्यावरती असताना एक सुखद वार्ता मुंबई महापालिकेने दिली आहे. वांद्र्याच्या के.बी. भाभा हॉस्पीटल मधील ५० वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्ण पुर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. दोन आठवड्यांच्या उपचारानंतर त्या आज आपल्या घरी परतणार आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कालच कोरोना व्हायरसच्या संक्रमणात घट होत असल्याचं सांगितलं आहे. सरकारने लॉकडाऊन (LockDwon) जाहीर करण्यापूर्वी 3 दिवसात रुग्णांची संख्या दुपटीने वाढत होती. पण आता लॉकडाऊन आणि इतर नियमांमुळे कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्यास 6 दिवस लागत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.
Updated : 18 April 2020 8:26 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire