Home > रिपोर्ट > 'या' नेत्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून केलं न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत

'या' नेत्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून केलं न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत

या नेत्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून केलं न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत
X

दिडशे वर्षापासून रखडलेल्या खटल्याचा अखेर आज निकाल लागला आहे. सरन्यायाधिश रंजन गोगाई आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पाच न्यायमुर्तींच्या खंडपिठाने आयोध्यातील जमिनीवर असलेला हिंदू मुस्लीम वाद सोडवलाआहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिरसाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी देण्याचे सांगितले गेलं आहे.

न्यायालयाच्या या ऐतिहासीक निर्णयाचा अनेक दिग्गजांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी स्विकार केला आहे. व याबद्दलआपले मत ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून मांडले आहे.

“सर्व धर्मांना सोबत घेऊन या देशात लोक नांदावे अशी परिस्थिती निर्माण करणं हे सर्व भारतीयांचं दायित्व आहे. शांतता आणि संयम आणि परस्पर सन्मान ठेवावा.” असं ट्विट करत नाकरिकांना शांत राहण्याचं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत अशी पोस्ट केली आहे. सोबतच त्यांनी म्हटलं आहे की, “दिवंगत नेते वाजपेयी जी, प्रमोदजी, मुंडे साहेब, सुषमाजी यांची आज उणीव जाणवते.सर्वोच्च न्यायालयाच्या योग्य व संतुलित निर्णयाने त्यांना निश्चित आनंद झाला असता.”

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील न्यायालयाच्या निर्णयांचे स्वागत करून सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

बारामती तालूक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्ष माधूरी गायकवाड यांनी माणूसकी पेक्षा कुटलाही धर्म मोठा नाही असं म्हणत न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान केला आहे.

पेशाने वकील असलेल्या मनसेच्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील फेसबुकवर पोस्ट करत सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे तसेच न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत. त्यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, “चला अनेक दिवसांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास रूढ झाला आहे. 2.67 एकर जमीनचा निकाल लावला पुराव्यानिशी अप्रतिम निर्णय. आणि मुस्लिम बंधूना सुद्धा 5 एकर जमीन दिली.त्याबद्दल न्यायालयाचे आभार.”

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आयोध्याप्रकरणी सरकारने घेतलेल्या निर्णाला घेऊन सर्वांनीच संयम पाळला पाहिजे आणि सर्व धर्मांचा आदर करण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे.

Updated : 9 Nov 2019 8:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top