Home > रिपोर्ट > देशातील तरुणांना आता स्थैर्य हवं आहे - पंकजा मुंडे

देशातील तरुणांना आता स्थैर्य हवं आहे - पंकजा मुंडे

देशातील तरुणांना आता स्थैर्य हवं आहे - पंकजा मुंडे
X

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपानं सोमवारी आक्रमक भूमिका घेतली. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी भूमिका भाजपने घेतली आहे. या मुद्यावर भाजपाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं आहे..

“सागरा प्राण तळमळला” या देशात तरुणांना काय हवंय… १९४७ पूर्वी स्वातंत्र्य हवं होतं. आता स्थैर्य हवं आहे. महात्म्यांचा अपमान त्यांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीनं केल्याने होतोच. प्रचंड संतापही होतो… सर्वांना होतो. त्यांच्या नावाच्या राजकारणाने पिडाही होते. कधी आपण संवेदनशील होऊन देशाच्या पुढील पिढीसाठी योगदान देणार? जसे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले..,”

https://twitter.com/Pankajamunde/status/1206600828062187520?s=20

असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

Updated : 17 Dec 2019 2:00 PM IST
Next Story
Share it
Top