आता उखाणे घ्या ऑनलाईन
X
उखाणा घेणे हा प्रत्येक महिलेचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. covid च्या काळात महिलांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाने नवरात्राच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन उखाणे स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठीचे व्हिडीओ दिनांक 10 सप्टेंबर पर्यंत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) जिल्हा कार्यालयाकडे पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली आणि निशुल्क आहे. या स्पर्धेतमध्ये ज्या महिलांना भाग घ्यायचा आहे त्यांनी जनजागृती करणारे, नाविण्यपूर्ण, सामाजिक आशय असणारे आणि त्याचप्रमाणे ऐतिहासिक मूल्य असणारे यापैकी एका उखाण्याचा दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांच्या कालावधीचा व्हिडीओ तयार करून माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे पाठवयाचे आहेत. जिल्ह्यात प्राप्त उखाण्याची जिल्हास्तरावर परीक्षकांकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्या महिलांचे तीन क्रमांक व माविमेत्तवर महिलांचे तीन क्रमांक असे सहा व्हिडीओ विभागीयस्तरावर पाठविण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या 07152-231126 / 8830778224 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा कार्यालयाच्या wardha.mavim@gmail.com या ईमेल वर संपर्क साधावा असे महिला आर्थिक विकास महामंडळाने कळविले आहे.