Home > रिपोर्ट > सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त कष्टकरी महिलांची संघर्षकथा

सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त कष्टकरी महिलांची संघर्षकथा

सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त कष्टकरी महिलांची संघर्षकथा
X

सकाळी उठल्यापासुन स्त्रियांच्या कामाची लगबग सुरु होते. मुलांना उठवणं, शाळेसाठी तयार करणं, शाळेत सोडणं, त्यांचा नाश्ता देणं, शाळेसाठी डबे भरुन देणं अशी सर्व तयारी चालु असते. सोबतच पतीचीही सेवा आलीच. असा संपुर्ण दिवस आपल्या कुटुंबासाठी देणाऱ्या स्त्रिया आपली स्वप्नं, आवडीनिवडी, छंद विसरुन जातात. मुल आणि चुल यातच आपल्या आयुष्याचं समाधान मानतात. मात्र, आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण भेटणार आहोत अशाच काही महिलांना ज्यांच्याकडे बघुन तुम्हालाही त्यांचा हेवा वाटेल.

कुणाला मुलगी असल्यामुळे शिकता आलं नाही, कुणाचं लहान वयातंच लग्न झालं तर कुणाच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती अशा अनेक कारणांमुळे या महिलांना शाळा सोडावी लागली. लग्नानंतरही शिक्षणाची ओढ काही कमी झाली नव्हती. मग पुन्हा पाठीला दप्तर लावुन या महिलांनी आता शाळेची वाट धरली.

चेंबुरमधील घाटला गावातील महानगरपालिकेची शाळा... इथं शाळकरी मुलांची शाळा भरत नाही, इथं कष्टकरी महिला शिकायला येतात. मासुम या संस्थेच्या माध्यामातुन महिलांसाठी रात्रशाळेचा उपक्रम राबवला जातो. दिवसभराच्या संसाराच्या व्यापातून थोडासा वेळ स्वत:साठी काढतात आणि आपल्या या जगात रमतात. पण, आपलं अर्धवट राहिलेलं स्वप्न साकारण्यासाठी म्हणजेच शिक्षण पुर्ण करण्यासाठी झटतात.

आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व शाळकरी महिलांनी त्यांच्या कार्याचं अभिवादन करण्यासाठी आणि समाजात महिलांना बरोबरीचं स्थान मिळवुन देण्यासाठी जो संघर्ष केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. तर आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊयात आणि पाहुयात या आजच्या युगातील सावित्रीची संघर्षयात्रा...

Updated : 3 Jan 2020 9:34 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top