एक मोजा जातो कुठे?
X
मुलांना शाळेत हस्तकलेच्या तासाला विवीध प्रोजेक्ट दिले जातात. सध्या ऑनलाईन शाळा सुरु असल्या तरी अजुनही असे प्रोजेक्ट दिले जात आहेत. त्यामुळे मुलांच्या प्रोजेक्टचे साहित्य कुठून आणायचं? असं प्रश्न अनेक पालकांसमोर आहे. पण काही मुलं ही इतकी क्रियेटीव्ह असतात की, ती पालकांचा त्रास वाचवुन ताप वाढवतात. अर्थात सगळ्याच पालकांना आपल्या मुलांची ही कलाकारी ताप वाटत नाही. असाच काहीसा अनुभव किर्तीकुमार शिंदे यांना आला आहे.
मुलगी ओवी ची ही कलाकारी किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबूकवर पोस्ट केली आहे. यात त्यांनी आपला अनुभवही सांगीतला आहे. “मोजे मला कधीच वेळेवर सापडत नाहीत. नवीन मोजे आणले, तरी ते गायब होतात... कधी एक मोजा सापडलाच, तर त्याचा जोडीदार गायब असतो... गायब झालेला एक मोजा आज अचानक सापडला.”
अशा प्रकारे आपल्या वस्तू कुठं जातात याचा शिंदे यांना शोध लागला आणि ओवीची सुंदर हस्तकला सुध्दा अनुभवता आली.