Home > रिपोर्ट > निसर्ग चक्रीवादळ मुंबईत दाखल, स्थलांतरीत कुटुंबं मुलाबाळांसह वाऱ्यावर

निसर्ग चक्रीवादळ मुंबईत दाखल, स्थलांतरीत कुटुंबं मुलाबाळांसह वाऱ्यावर

निसर्ग चक्रीवादळ मुंबईत दाखल, स्थलांतरीत कुटुंबं मुलाबाळांसह वाऱ्यावर
X

मुंबईमध्ये काही मिनिटांच्या अंतरावर निसर्ग चक्रीवादळ येऊन धडकण्याची शक्यता असतानाच मानखुर्द मध्ये असलेल्या महाराष्ट्रनगर, मंडाळा गाव, चिता कॅम्प, साठेनगर, परिसरातील अनेक लोक पालात आणि कच्च्या झोपड्यामध्ये राहतात. आपल्याला महापालिकेने कसली माहिती दिली नाही त्यामुळे अजूनही आपल्या लहान मुलाबाळांसह पालातच राहत असल्याचं ताराबाई यांनी सांगितलं.

मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानखुर्द परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या शेकडो लोकांची महापालिका प्रशासनाने म्हणावी तशी खबरदारी घेतली नाही. तर दुसरीकडे रस्त्याच्याकडेला पालांवर राहणारे शेकडो लोक अद्यापही आपल्या पालात असून चक्रीवादळाच्या संदर्भात महापालिका प्रशासनाने आपल्याला सुरक्षित स्थळी नेण्याची व्यवस्था केली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

मानखुर्द पश्चिमेला पीएमजीपी कॉलनी शेजारी साठेनगर हा झोपडपट्टीने व्यापलेला परिसर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच मराठवाड्यातील लोक राहतात. महापालिका प्रशासनाने त्यांची कुठेही सुरक्षीत स्थळी व्यवस्था केली नसल्याचे स्थानिकांनी सांगितलं.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/179916026751557/?t=0

Updated : 3 Jun 2020 7:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top