Home > रिपोर्ट > दिल्ली निर्भया केस : ‘त्या’ दोषींची फाशी अखेर अटळ

दिल्ली निर्भया केस : ‘त्या’ दोषींची फाशी अखेर अटळ

दिल्ली निर्भया केस : ‘त्या’ दोषींची फाशी अखेर अटळ
X

दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुकेशची दया याचिका फेटाळली होती. याविरोधात मुकेशच्या वकील अंजना प्रकाश यांनी राष्ट्रपतींसमोर संपूर्ण कागदपत्रे समोर ठेवण्यात आली नाही. दया याचिका फेटाळण्यात घाई करण्यात आली, असा दावा केला होता. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता. राष्ट्रपतींनी हा दयेचा अर्ज दाखल केला होता.

न्यायमूर्ती भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती भानुमती यांनी राष्ट्रपतींसमोर खटल्याशी संबंधित योग्य कागदपत्रे सादर करण्यात आली की नाही, इतकंच पाहणं न्यायालयाचं काम आहे. असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारीला तिहार तुरुंगात या खटल्यातील चारही आरोपींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

१६ डिसेंबर २०१२ ला दिल्लीत २३ वर्षीय निर्भयावर धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी अत्याचार केला होता. यामध्ये तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने सर्व देश हादरला होता.

हे ही वाचा

‘आशा’ वर्करना हॉर्वर्ड विद्यापाठीच्या माध्यमातून प्रशिक्षण – राजेश टोपे

एक सन्मान स्त्रीच्या_स्त्रीत्वाचा…

जीवनशाळेची सहल…

दरम्यान न्यायालयाच्या या निर्णया नंतर निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींचे शिक्षेविरोधात दाद मागण्याचे सर्व कायदेशीर मार्ग संपुष्टात आले आहेत. त्यामुळे या आरोपींची फाशी आता अटळ आहे.

Updated : 29 Jan 2020 6:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top