तृप्ती देसाई आणि लवांडेंचा पंगा..
X
भुमाता ब्रीगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी काही दिवसांपुर्वी मला सोशल मीडीयावर अश्लील शिव्या देणारे ८० टक्के तरुण मराठा असून मला मराठा समाजात जन्माल्याची खंत वाटते अशी भानविक पोस्ट लिहली होती.
- आज मराठा समाजात जन्मल्याची खंत वाटते- तृप्ती देसाई
- उद्धव ठाकरे आपल्या घरातले बीग बॉस- तृप्ती देसाई
- Fact Check | ‘या’ फोटोतील महिला खरंच तृप्ती देसाई आहेत का?
या पोस्ट मध्ये तृप्ती देसाई यांनी शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनाही टॅग केलं होत. या फेसबुक पोस्टवरुनही तृप्ती देसाई यांच्यावर पुन्हा टोलर्संनी निशाणा साधला होता.
या पोस्टवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande) यांनीही तृप्ती देसाई यांना नाव न घेता चांगलचं सुनावलं आहे. त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन ही पोस्ट लिहली असून समस्त मराठा समाजाला दोषी ठरवणं चुकीचं असल्यांचं मत व्यक्त केलंय.
सोशल मीडियातील ट्रोलिंगमुळे कुणी तरी #मराठा समाजाला दोषी ठरवले या निमित्ताने म्हणून माझे मनोगत
---- विकास लवांडे
सोशल मीडियात खालच्या पातळीवर कुणावरही टिका टिप्पण्या करणारी एक जमात सतत सक्रिय असते. ती प्रवृत्ती असून शेकडो हजारो वर्षांपासून समाजात जिवंत आहे. ती प्रवृत्ती कुणालाच सोडत नाहीत ते कधी #जात्यंध असतात कधी #धर्मांध असतात तर कधी अविवेकी अंधश्रद्धाळू असतात. अनेकजण आत्मकेंद्री व्यक्तिप्रेमी असतात. अशावेळी त्यांच्या जातीला किंवा धर्माला किंवा सर्व समाजाला दोषी ठरवणं अजिबात योग्य नसते.ते ट्रोलर कुणाचेच अधिकृत प्रतिनिधी नसतात.
कोणताही #सामाजिक सुधारणा कृतीकार्यक्रम किंवा राबवताना किंवा सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करताना कार्यकर्त्याने तो आपल्या व्यक्तिगत प्रतिष्ठेचा करायचा नसतो हे त्या कार्यकर्त्याने किंवा नेत्याने कायम लक्षात ठेवावेत.म्हणजे मग आपल्याला कसलाही व्यक्तिगत त्रास वाटत नाही.
सामाजिक कामात सक्रिय असताना मान अपमान टीका टिप्पणी कुणालाच सोडत नसतात हा इतिहास आहे. ज्याला ते सहन करता येत नाहीत त्यांनी अशा कार्यापासून अलिप्त असावे.
जो जाती धर्म भाषा पंथ प्रांत इत्यादी संकुचित चौकटीच्या बाहेर राहूनच समाजाचा विचार करतो तोच कार्यकर्ता त्या समाजाला योग्य दिशेने घेऊन जात असतो. कारण जाती धर्म वर्ण पंथ भाषा प्रांत मानवनिर्मित आहेत निसर्गनिर्मित नाहीत.
प्रसारमध्यमाद्वारे सतत प्रसिद्धी मिळते या नादात आपली भाषा व आपली विधान अनेकदा किती टोकदार - तिखट किंवा मनमानी - अविवेकी - पद्धतीची असतात याचे त्यांना भान रहात नाही.
सार्वजनिक जीवन जगणाऱ्या कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याला (राजकीय कार्यकर्ता नव्हे ) किंवा नेत्याला स्वजातीचा किंवा स्वधर्माचा आधार घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपली असणारी वैचारिक व तात्विक बैठक नक्कीच तपासण्याची गरज असते.
ज्यांना सततच्या सामाजिक कामात सक्रिय असताना नैराश्य येते किंवा चिडचिड होते त्यांना वेळोवेळी आत्मचिंतनाची खूप गरज असते. आपले अंतिम उद्दिष्ट काय ? आपल्या जीवनाचा अर्थ काय ? याचा सखोल विचार त्यांनी करायाचा असतो.विपश्यना (मी केलेली नाही पण इतरांच्या अनुभवाद्वारे) केल्यास अधिकच फायदा होऊ शकतो हे नम्रपणे सांगू इच्छितो.
मी माझ्या 28 वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनाच्या अनुभवातून व्यक्त झालेलो आहे.
(ही चर्चा पुरेशी नाही आणखी सविस्तर चर्चा होऊ शकते )
धन्यवाद !