इंदिरा गांधी या खर्या अर्थाने महान नेत्या होत्या - शरद पवार
Max Woman | 31 Oct 2020 4:30 PM IST
X
X
भारताची पहिली आणि एकमेव महिला पंतप्रधान, 'आर्यन लेडी ऑफ इंडिया' अशा अनेक नावांनी इंदिरा गांधी यांना नावाजले जाते. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अनेक दिग्गज नेत्यांनी विनम्र श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील यानिमीत्ताने सोशल मिडीयावर पोस्ट केलं आहे.
इंदिरा गांधी या खर्या अर्थाने महान नेत्या होत्या. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात लक्षणीय कामगिरी केली आहे. त्यामुळे आजही त्या लोकांच्या मनात जिवंत आहेत.
इंदीरा गांधी यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३० ऑक्टोंबर १९८४ या दिवशी दुपारी भुवनेश्वर मध्ये इंदिरा गांधी यांनी भाषण केलं होत. यादरम्यान त्या ठरवल्या प्रमाणे न बोलता वेगळचं काही बोलून गेल्या. त्या म्हणाल्या की,
"आज मी इथे आहे उद्या नसेन, पण मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करत राहीन. मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब अन् थेंब भारताला बळकट करण्यासाठी खर्ची करेन."
त्यांच हे भाषण त्यांच्या आयुष्यातील शेवटच भाषण ठरलं आणि दुसऱ्यांच दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोंबर १९८४ साली त्यांच्यावर गोळीबार झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पुण्यतिथी निमित्त शरद पवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. यामुळे इंदीरा गांधींनी केलेल्या शेवटच्या भाषणाचं चित्र पुन्ह्यांदा डोळ्यासमोर उभे राहीलं.
Updated : 31 Oct 2020 12:46 PM IST
Tags: gandhi india indira gandhi indira gandhi (author) indira gandhi (politician) indira gandhi 35th death anniversary indira gandhi biography indira gandhi death indira gandhi death anniversary indira gandhi husband indira gandhi jayanti indira gandhi murder indira gandhi murdered indira gandhi speech pm indira gandhi rahul gandhi sonia gandhi
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire