का लोकप्रिय आहेत नवनीत कौर राणा?
X
मूळच्या पंजाबी असणा-या नवनीत यांचं सर्व शिक्षण मुंबईतच झालं, त्यामुळे त्या मराठी देखील उत्तम बोलतात. त्यांचे वडील लष्करात अधिकारी होते. नवनीत कौर यांना योगासनांमध्ये विशेष स्वारस्य असून, त्या बाबा रामदेव यांच्या प्रशंसक आहेत. युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार म्हणून यंदा निवडणूक लढवणा-या नवनीत कौर; बडनेराचे याच पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत, शिवाय राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी अनेक दाक्षिणात्य तसंच पंजाबी चित्रपटांमधून भूमिकाही केलेल्या आहेत. 2011 साली अमरावतीमधील एका मोठ्या सामुदायिक विवाह सोहळ्यात त्यांनी रवी राणा यांच्याशी लग्न केले होते. 2014 साली त्यांना राष्ट्रवादीकडून अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. यंदाच्या निवडणूकीत त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. मराठी भाषिक नसूनही अमरावतीमध्ये त्यांचं समाजकार्य आणि जनसंपर्क उल्लेखनीय आहे. विशेषत: महिला मतदारांमध्ये त्या लोकप्रिय आहेत.