Home > रिपोर्ट > देशातील पहिल्या राजकीय LGBT सेलच्या अध्यक्ष पदी प्रिया पाटील यांची नियुक्ती

देशातील पहिल्या राजकीय LGBT सेलच्या अध्यक्ष पदी प्रिया पाटील यांची नियुक्ती

देशातील पहिल्या राजकीय LGBT सेलच्या अध्यक्ष पदी प्रिया पाटील यांची नियुक्ती
X

आज राष्ट्रवादी काँग्रेसने एलजीबीटी समूहाला (गे, लेस्बियन, बायसेक्सुअल, ट्रान्सजेंडर) मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एलजीबीटी सेल ची स्थापना केली आहे. एलजीबीटी कम्युनिटीचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी हा एलजीबीटी सेल प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई कार्यलयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या सेलचे उदघाटन करण्यात आलं आहे. शिवाय, आज या एलजीबीटी सेलच्या पदाधिकारांच्या सुद्धा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

पक्षाच्या ट्विटर हँडलवर या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे राजकीय पक्षांमध्ये महिला, ओबीसी, एस-एसटी, अल्पसंख्याक, सिनेकलाकार, कामगारांसाठी असे वेगवेगळे सेल असतात. प्रत्येक पक्षानुसार त्यांना वेगवेगळी नावे असतात. राष्ट्रवादीतही तसे सेल आहेत. आता त्यात एलजीबीटी सेलची भर पडणार आहे.

[gallery ids="16902,16903,16904,16905,16906,16907,16909,16910,16901"]

या सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून एलजीबीटी सेल' स्थापन करुन या वंचित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलयांनी सांगितले. “समाजात एलजीबीटी लोक चौकटीत यायला बघत असतात. त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. याचा विचार राष्ट्रवादीने केला आहे शिवाय राष्ट्रवादीने निवडणूक काळात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पाऊल टाकले आहे.” असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. एलजीबीटी सेलची आज स्थापना झाली असून प्रिया पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणारे १४ जण प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

https://twitter.com/NCPspeaks/status/1312977414176206849

दरम्यान या आधी राष्ट्रवादीने देशात पहिल्यांदा युवती संघटनेचा प्रयोग केला होता.

Updated : 6 Oct 2020 12:39 PM IST
Next Story
Share it
Top