Home > रिपोर्ट > Coronavirus : 'त्या' कुटुंबातील 9 लोकांना कोरोना ची लागण...

Coronavirus : 'त्या' कुटुंबातील 9 लोकांना कोरोना ची लागण...

Coronavirus : त्या कुटुंबातील 9 लोकांना कोरोना ची लागण...
X

सांगली जिल्ह्यातील एकाच कुंबातील 5 व्यक्तींना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. आता त्याच कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील कोराना ची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आत्ता पर्यंत कोरोना पॉझिटिव रुग्णांची एकूण संख्या 9 वर गेली आहे.

विशेष बाब हे सर्व कोरानाग्रस्त एकाच कुटुंबातील आहेत. सकाळी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल आता पॉझिटिव्ह आले आहेत. या अहवालानंतर ते कोणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे.

त्यामुळं आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर भागात कोराना चे रुग्ण वाढू देखील शकतात. या संदर्भात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी त्यांच्याशी संपर्क आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती घेत असल्याचं माध्यमांना सांगितलं.

आत्ता आलेल्या तपासणी अहवाला नुसार दोन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मुलगी असा समावेश आहे. एकूण 4 पुरुष, 4 महिला आणि 1 लहान मुलगी असे आत्ता पर्यंत 9 जण इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील आहेत.

सरकारी आकडेवारी नुसार राज्यातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या आता 122 वर गेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.

Updated : 25 March 2020 6:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top