आपल्या घराच्या बाहेर लक्ष्मण रेषा आहे ती पार करू नका - पंतप्रधान नरेंद्र मोदी
X
आज रात्री १२ वाजल्या पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन केला जाणार
या महामारीबद्दल तुम्ही माध्यमांमधून बघत असाल, समजून घेत असाल. अनेक मोठ्या देशांना या कोरोना मुळे झुकावं लागलं. संसाधन असूनही या देशांना झगडावं लागतंय
या देशांच्या दोन महिन्याच्या अभ्यासानंतर विविध तज्ज्ञांच्या मते सोशल डिस्टंसिंग हाच एकमेव उपाय आहे
आपापल्या घरात राहा, संक्रमणाचं चक्र तोडलं पाहिजे. तरच या विषाणू वर नियंत्रण मिळवता येईल
काहींना वाटतंय की फक्त आजारी किंवा बाधीत लोकांनीच काळजी घ्यायची आहे किंवा सोशल डिस्टंसिंग पाळलं पाहिजे. पण हे योग्य नाही हे सर्वांसाठी आहे.
जर आपण बेजबाबदार पणे वागलो तर याची मोठी किंमत भारताला मोजावी लागेल. ती किती असेल याची कल्पनाच करता येणार नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशांचं पालन करा
आज रात्री १२ वाजल्या पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन केला जाणार आहे. देशाला वाचवण्यासाठी, आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन
जर आपण बेजबाबदार पणे वागलो तर याची मोठी किंमत भारताला मोजावी लागेल. ती किती असेल याची कल्पनाच करता येणार नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशांचं पालन करा
आज रात्री १२ वाजल्या पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन केला जाणार आहे. देशाला वाचवण्यासाठी, आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन
ही निर्णायक लढाई आहे त्यासाठी हे महत्वाचं आहे. याची मोठी आर्थिक किंमत देशाला चुकवावी लागेल. पण जीव वाचवण्यासाठी हे करावंच लागेल.
हा एक प्रकारचा कर्फ्युच आहे. जनता कर्फ्यु पेक्षा कडक.
हा लॉकडाऊन तीन आठवडे म्हणजे २१ दिवसांचा आहे
जर हे २१ दिवस आपण नाही सांभाळलं तर देश २१ वर्षे मागे जाईल. आपला परिवार उद्ध्वस्त होऊन जाईल. हे टाळायचं असेल तर #लॉकडाऊन पाळायचं आहे
आपल्या घराच्या बाहेर लक्ष्मण रेषा आहे ती पार करू नका.
मी देशाचा पंतप्रधान म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबाला सदस्य म्हणून लॉकडाऊनची विनंती करत आहे.
WHO च्या रिपोर्टप्रमाणे एक संक्रमित व्यक्ती शेकडो लोकांना कोरोनाची लागण करू शकतो. आगी सारखा हा रोग पोहोचतो. त्यामुळे काळजी घ्या.
पहिले एक लाख लोक संक्रमित होण्यात ६८ दिवस लागले नंतरचे एक लाख लोक संक्रमित होण्यास ११ दिवस आणि पुढचे एक लाख लोक संक्रमित होण्यात फक्त ४ दिवस लागले.
चीन, जापान, इटली, स्पेन, अमेरिका, जर्मनी अशा देशांमध्ये अत्याधुनिक आरोग्य सेवा असूनही हे देश कोरोनाचा प्रभाव कमी करू शकले नाहीत.
अशा परिस्थितीत आशेचा किरण कुठेय. ज्या देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवलं त्यांचा अनुभव हाच आपला आशेचा किरण आहे. घरात राहून या देशांनी कोरोना वर नियंत्रण मिळवलं.
जर हे २१ दिवस आपण नाही सांभाळलं तर देश २१ वर्षे मागे जाईल. आपला परिवार उद्ध्वस्त होऊन जाईल. हे टाळायचं असेल तर #लॉकडाऊन पाळायचं आहे
पहिले एक लाख लोक संक्रमित होण्यात ६८ दिवस लागले नंतरचे एक लाख लोक संक्रमित होण्यास ११ दिवस आणि पुढचे एक लाख लोक संक्रमित होण्यात फक्त ४ दिवस लागले
चीन, जापान, इटली, स्पेन, अमेरिका, जर्मनी अशा देशांमध्ये अत्याधुनिक आरोग्य सेवा असूनही हे देश कोरोनाचा प्रभाव कमी करू शकले नाहीत. अशा परिस्थितीत आशेचा किरण कुठेय. ज्या देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवलं त्यांचा अनुभव हाच आपला आशेचा किरण आहे. घरात राहून या देशांनी कोरोना वर नियंत्रण मिळवलं
ही धैर्य आणि शिस्त दाखवण्याची घडी आहे
आरोग्य सेवा चालवणारे, अत्यावश्यक सेवा चालवणारे, रूग्णालयाचा कर्मचारी वर्ग या सर्वांचा विचार करा, तुमच्या भागाला स्वच्छ- निर्जंतुक करण्यासाठी झटणाऱ्या लोकांचा, पोलीसांचा विचार करा
हे सर्व देशाचे सेवक आहेत. त्यांना लोकांच्या रोषाला ही सामोरं जावं लागतंय
देशातील अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. जीवन जगण्वयासाठी आवश्यक सर्व प्रयत्न केले जातील..
कोरोनाच्या रूग्णांना उपचार देण्यासाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटींची व्यवस्था केली आहे सर्व राज्यांचा अग्रक्रम फक्त आरोग्य सेवा हेच असलं पाहिजे, सर्व राज्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.