Home > रिपोर्ट > मुक्ता टिळक म्हणतात 'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय...'

मुक्ता टिळक म्हणतात 'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय...'

मुक्ता टिळक म्हणतात  मला आमदार झाल्यासारखं वाटतंय...
X

पुण्यातील गणेश विसर्जनाचा सोहळा अगदी थाटात साजरा झाला. या सोहळ्याच्या मिरवणूकीत अनेक नेते देखील सामील झाले होते. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतयं’ या गाण्यावर लक्षवेधक ठेका धरला.

आगामी विधानसभा निवडूका जवळ आल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष इच्छूक उमेदारांची चाचणी करत आहेत. त्यात आपला जनसंपर्क किती मोठा आहे? हे सिद्ध करण्यासाठी राजकीय नेते गणेश मंडळाच्या गाटीभेटी घेताना दिसत आहेत.

यादरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कसबा मतदार संघातून भाजपकडून इच्छुक असनाऱ्या महापौर मुक्ता टिळक, यांनी या सर्व मंडळाचे स्वागत अलका चौकात उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये नारळ देऊन केले. यावेळी महापौर मुक्ता टिळक यांना ‘मला आमदार झाल्यासारखे वाटतंय’ या गाण्यावर ठेका धरण्याचा आग्रह सर्वांनी केला. त्यांनीदेखील सर्वांचा आग्रह पाहता या गाण्यावर ठेका धरला.

Updated : 13 Sept 2019 5:16 PM IST
Next Story
Share it
Top