CoronaVirus: राज्यात ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू
X
राज्यात काल दिवसभरात १२२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यात ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २२८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ८३ हजार ८७५ नमुन्यांपैकी ७२ हजार ३०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार ४५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ५३८ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ०९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात १०३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७४ (मुंबई ४९, ठाणे १, नवी मुंबई ४, पनवेल ४, रायगड ६, मीरा भाईंदर- १०), नाशिक- २ (नाशिक १, अहमदनगर १), पुणे- २१ (पुणे १०, सोलापूर ५, सातारा ६), कोल्हापूर- ३ (सांगली ३) अकोला-३ (अकोला ३).
काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६८ पुरुष तर ३५ महिला आहेत. काल नोंद झालेल्या १०३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५९ रुग्ण आहेत तर ३९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या १०३ रुग्णांपैकी ६९ जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २४६५ झाली आहे.
काल नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १ मे ते ३० मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्यूंपैकी मुंबई २९, मीरा भाईंदर -९, सातारा -६, सोलापूर -४, नवी मुंबई -३, रायगड -३, सांगली ३, पनवेल -२, अकोला -३, ठाणे -१, नाशिक -१ आणि अहमदनगर -१ असे आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४२,२१६), बरे झालेले रुग्ण- (१७,२१३), मृत्यू- (१३६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,६२९)
ठाणे: बाधित रुग्ण- (१०,४०४), बरे झालेले रुग्ण- (३७३२), मृत्यू- (२३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४४२)
पालघर: बाधित रुग्ण- (११२२), बरे झालेले रुग्ण- (४४३), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४६)
रायगड: बाधित रुग्ण- (१२०९), बरे झालेले रुग्ण- (६२१), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३५)
नाशिक: बाधित रुग्ण- (१२१२), बरे झालेले रुग्ण- (९१९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (१४१), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४)
धुळे: बाधित रुग्ण- (१७३), बरे झालेले रुग्ण- (९३), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४)
जळगाव: बाधित रुग्ण- (७६०), बरे झालेले रुग्ण- (३२४), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६४)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (३७), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)
पुणे: बाधित रुग्ण- (८१९६), बरे झालेले रुग्ण- (४३१७), मृत्यू- (३४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५३१)
सोलापूर: बाधित रुग्ण- (९३४), बरे झालेले रुग्ण- (४४३), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१६)
सातारा: बाधित रुग्ण- (५६२), बरे झालेले रुग्ण- (१७८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६२)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (५४३), बरे झालेले रुग्ण- (२०५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३४)
सांगली: बाधित रुग्ण- (१२४), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५२), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३०४), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८१)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१५९२), बरे झालेले रुग्ण- (१०६०), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६४)
जालना: बाधित रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१)
हिंगोली: बाधित रुग्ण- (१९१), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८५)
परभणी: बाधित रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)
लातूर: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (३२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)
बीड: बाधित रुग्ण- (४७), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)
नांदेड: बाधित रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)
अकोला: बाधित रुग्ण- (६४२), बरे झालेले रुग्ण- (३४६), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६४)
अमरावती: बाधित रुग्ण- (२४५), बरे झालेले रुग्ण- (१३८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (१३१), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (४२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)
वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)
नागपूर: बाधित रुग्ण- (६१४), बरे झालेले रुग्ण- (३८१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२२)
वर्धा: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)
भंडारा: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)
गोंदिया: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (३८), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)
एकूण: बाधित रुग्ण-(७२,३००), बरे झालेले रुग्ण- (३१,३३३), मृत्यू- (२४६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टिव्ह रुग्ण-(३८,४९३)
(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ३४४ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३७३० झोन क्रियाशील असून आज एकूण १९ हजार ०१९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७१.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.