मेलींडा गेट्स यांनी उचललं ट्रम्प विरोधात पाऊल
X
जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक बील गेट्स आपल्या दानशूरपणामुळे बरेच चर्चेत असतात. भारतातही त्यांचं सामाजिक संस्थांसाठी मोठं योगदान आहे. भारतातही सामाजिक प्रश्नांवर बील गेट्स आणि त्यांची पत्नी मेलींडा गेट्स यांनी मोलाचं सहाय्य केलं आहे. याच मेलींडा गेट्स (Melinda Gates) अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या कोरोना व्हायरस महामारीच्या जागतिक संकटकाळातील WHO चा सहाय्य निघी रोखण्यावरुन चागंल्याच भडकल्या आहेत.
- जितेंद्र आव्हाडांच्या मुलीसंबंधित खोटी बातमी लावणाऱ्या आणखी एका चॅनेलला दणका
- 'आरश्यात स्वतःच्या नजरेला नजर देता येतेय का?', रुपाली चाकणकरांचा सवाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी संकटकाळात जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यप्रणालीवर आक्षेप घेत दिला जाणारा सहाय्यनिधी स्थगित केला आहे. त्यांच्या या निर्णयावर विरोध दर्शवताना मिलेंडा गेट्स यांनी WHO ला २५० मिलीयन डॉलर्सची भरीव मदत केली आहे. कोरोनो व्हायरस महामारीच्या काळात WHO चा सहाय्य निधी रोखण्यात काहीच अर्थ नाही असंही त्यांनी ट्रम्प यांना उद्देशून म्हटलंय.
“WHO ही जागतिक स्तरावर आपत्तीकाळात काम करणारी जागतिक समन्वयक संस्था आहे. WHO या महामारी विरोधात योग्य उपाययोजना करण्यासाठी सक्षम आहे. या वातावरणात आपल्याला लाखो करोडो रुपयांची मदत करण्यासाठी पुढे सरसावलं पाहिजे.” अशी भावना व्यक्त केली आहे.