अभिनेत्री ते गुगल इंडियाची उद्योगप्रमुख मयुरी कांगो
X
कला विश्वातील अनेक कलाकार राजकारणात येताना आपण पाहिले आहे. मात्र एखाद्या अभिनेत्रीने उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेणं क्वचितच घडलंय. होय पापा कहते है चित्रपटातील अभिनेत्री मुयरी कांगो आता गुगल इंडियाची उद्योगप्रमुख झाली आहे. यापूर्वी मयुरीने परफ़ॉर्मिक्स डॉट रिझल्ट्रीक्स कंपनीच्या पब्लिसीस ग्रुपची मॅनेजिंग डायरेक्टर या पदाची धुरा सांभाळली होती.
‘पापा कहते है’ नंतर तिचा ‘होगी प्यार की जीत’ हा एकमेव चित्रपट तिकीटबारीवर गाजला त्यानंतर तिचे नंतरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. बॉलिवूडमध्ये नशीब आजमावल्यानंतर तिने तिचा मोर्चा तमिळ चित्रपट व छोट्या पडद्यावरील मालिकांच्या दिशेने वळवला. सातत्याने हाती येणारे अपयश पाहून शेवटी मयुरीने अभिनयक्षेत्राला कायमचा रामराम ठोकला.
अभिनय सोडल्यानंतर न्यूयॉर्कमधील ३६० आय या डिजीटल एजन्सीमध्ये ती नोकरी करु लागली. त्यानंतर त्याच कंपनीत तिला मीडिया मॅनेजर या पदावर बढती मिळाली. त्यानंतर तिने परफॉर्मिक्स डॉट रिझल्ट्रीक्स कंपनीच्या पब्लिसीस ग्रुपची मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केले. आणि आता तर ती थेट गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड झाली आहे.