कोरोनाग्रस्त महिलेसमोर लघुशंका…
X
नाशिक मधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाग्रस्त महिला स्वच्छतागृहात असताना, रुग्णालयाचा सुरक्षारक्षक संशयित कैलास शिंदे (५६) याने स्वच्छतागृहाच्या दरवाजावर लाथ मारत दरवाजा उघडला. आणि सदर महिलेसमोर लघवी केली. अशी तक्रार महिलेने केली आहे.
या प्रकारानंतर महिलेने आरडाओरड केल्यावर संशयित फरार झाला. याप्रकरणी महापालिका वैद्यकीय अधिक्षकांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी फरार शिंदे यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
वैद्यकीय तपासणीनंतर आज गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे भद्रकाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक साजन सोनवणे यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणाने राज्यात पुन्हा एकदा कोव्हिड सेंटर मधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.