महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, माधुरी कानेटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी वर्णी
X
भारतीय लष्करात महिलांची वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शनिवारी मेजर जनरल माधुरी कानेटकर यांना लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली आहे. त्या लेफ्टनंट जनरल बनणाऱ्या भारतीय सैन्यदलातील तीसऱ्या महिला अधिकारी आहेत. तर, महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी आहेत. माधुरी कानेटकर आता आर्मी मुख्यालयात इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफमध्ये पदभार सांभाळणार आहेत.
माधुरी कानेटकर सशस्त्र दलातील पहिल्या बाल रोग विशेषज्ञ आहेत ज्यांना ही रॅंक देण्यात आली आहे. कानेटकर यांचे पती राजीव हेदेखील लेफ्टनंट जनरल आहेत. सशस्त्र दलात या पदावर पोहोचणारे ही पहिलीच जोडी आहे. माधुरी कानेटकर गेल्या ३७ वर्षांपासून भारतीय सैन्यात काम करत आहेत. मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांना शनिवारी लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली. कानिटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी निवड गेल्या वर्षीच झाली होती, पण जागा रिक्त झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पदभार स्वीकारला.