महिला व मुलींकरीता मोफत कराटे प्रशिक्षणाचे आयोजन
Max Woman | 14 Dec 2019 6:09 PM IST
X
X
खामगाव महिला आणि मुलींसोबत दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या त्या अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण देश सतर्क झालेला आहे यामध्ये बुलडाणा जिल्हा पोलीस दलाने एक पाऊल पुढे नेतात महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात ' कळी उमलताना' या प्रकल्पाची बुलडाणा जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आली. यामध्ये शनिवारी सकाळी खामगाव येथील जिल्हा परिषद कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कळी उमलताना या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे.
यामध्ये शनिवारी खामगाव शहरात स्वराज्य फाऊंडेशन खामगाव, पोलीस प्रशासन खामगाव व बुलडाणा जिल्हा जेनसुरयो कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी,मुलींसाठी व विद्यार्थिनींसाठी मोफत कराटे शिबीर आयोजित केले आहे तर या शिबिराचे उद्घाटन सकाळी 8 वा जिल्हा परिषद कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रोड येथे झाले. या उद्घाटन कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बुलडाणा जिल्हाधिकारी श्रीमती सुमन चंद्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ हे प्रमुख मार्गदर्शक होते.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अप्पर पोलिस अधीक्षक हेमाराजसिंह राजपूत, मा.तहसीलदार शितलकुमार रसाळ,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, विभागीय पोलीस अधिकारी मलकापूर प्रिया ढाकणे, बुलडाणा महिला सेल च्या प्रमुख निकाळजे मॅडम,जि.प.कन्या शाळेच्या प्राचार्य सौ.अनुराधा भावसार शहर पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुनील अंबुलकर, शिवाजी नगर पोलिस स्टेशन चे ठाणेदार रवींद्र देशमुख, ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार रफिक शेख,व स्वराज्य फाऊंडेशन चे अमोल गावंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी चंद्रा म्हणाल्या की मुलींनी घाबरून जाण्याचे आवश्यकता नाही जिल्हा प्रशासन त्यांच्या सोबत आहे माझे कार्यालय नेहमी च त्यांच्या साठी खुले आहे. तसेच जिल्हाधिकारी मॅडम यांच्या हस्ते हेल्पलाईन नंबर महिलांसाठी १०९१ किंवा मोबाईल क्रमांक ८६९८००००११ हे क्रमांक देण्यात आले. तसेच जिल्हा पोलिस अअधिकांनी मार्गदर्शन करतांना महिला आणि मुलींसाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या विवध सुविधांची माहिती देत सांगितले की मुलींच्या व महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने तक्रार पेट्या, किंवा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आले आहे. महिला व मुलीनी या सेवेचा फायदा घ्यावा असे आव्हान यावेळी त्यांनीं केले आहे.
https://youtu.be/ur5DLad9lsY
Updated : 14 Dec 2019 6:09 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire