बुफेच्या जमान्यात मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला पंगतीचा आस्वाद...
X
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर तसेच मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मतदारसंघात पोहोचलेल्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर या आपल्या विधानांनी चर्चेत होत्या. मात्र आता त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मंत्रिपद म्हटलं की मोठ्या गाड्या, सोबत ५-६ बॉडीगार्ड,पोलिस अशी तामजाम असते. कुठेही जायचं असलं तरी सुद्धा सर्व लवाजमा घेऊनच जातात. मात्र काही मंत्री या तामजाममातून अलिप्त राहतात.याचा प्रत्येय अमरावतीत आला.
मंत्रीपदाचा बडेजाव बाजूला ठेवून त्या सामान्य व्यक्तीप्रमाणे चटईवर पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेत आहेत. ईतर वेळेला मंत्र्यांचा प्रोटोकॉल असतो, मात्र सामान्य व्यक्ती प्रमाने अमरावतीच्या पालकमंत्री व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील एका कार्यक्रमात भर पंगतीत खाली बसून जेवणाचा आस्वाद घेतला त्यांच्या सोबत मोर्शी वरुडचे आमदार देवेंद्र भुयार सुद्धा उपस्थित होते. यशोमती ठाकूर ह्या तिवसा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असुन त्यांना आता महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्र्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र मंत्रीपदाच्या प्रोटोकॉलची तमा न बाळगता आपल्या कार्यकर्ते व जिल्ह्यातील लोकांजवळ बसून त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
https://youtu.be/gEQvgSqcnKc