Home > रिपोर्ट > लॉकडाऊन 3 मध्ये ग्रीन झोनला दिलासा, तर ‘हे’ आहेत रेड झोन मधील जिल्हे

लॉकडाऊन 3 मध्ये ग्रीन झोनला दिलासा, तर ‘हे’ आहेत रेड झोन मधील जिल्हे

लॉकडाऊन 3 मध्ये ग्रीन झोनला दिलासा, तर ‘हे’ आहेत रेड झोन मधील जिल्हे
X

देशभरातील नागरिक लॉकडाऊन संपुष्टात येण्याची वाट पाहत असताना केंद्र सरकारने या लॉकडाऊन मध्ये दोन आठवड्यांची वाढ केली आहे. लॉकडाऊनचा तीसरा टप्पा १७ मे पर्यंत राहणाकर आहे. मात्र, तीसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वांसह कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिलासा दिला आहे.

करोनाबाधित क्षेत्रासाठी आता लाल, नारंगी आणि हिरव्या श्रेणी जाहीर केल्या आहेत. लाल श्रेणीतील जिल्ह्यंमध्ये टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी होईल. नारंगी श्रेणीतील जिल्ह्यांत काही प्रमाणात आर्थिक व्यवहार चालू राहतील. हिरव्या श्रेणीतील जिल्ह्यंमध्ये सर्व प्रकारच्या व्यवहारांना मुभा आहे.

विमानसेवा, रेल्वेसेवा आणि बससेवा यांबरील बंदी कायम राहणार आहे. मात्र, स्थलांतरीत मजुरांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत. धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. तसेच सार्वजनिक कार्यक्रम आणि सोहळ्यांनाही बंदी कायम राहील. शाळा, महाविद्यालयं आणि अन्य शैक्षणिक संस्था बंद राहतील. हॉटेल, चित्रपटगृहं, मॉल, क्रिडा संकुले इत्यादी सार्वजनिक ठिकाणे बंद राहणार .

श्रेणीनुसार राज्यातील जिल्ह्यांची विभागणी

लाल श्रेणी- मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगांव, मुंबई उपनगर.

नारंगी श्रेणी- रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदूरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड.

हिरवी श्रेणी- अन्य सर्व जिल्हे.

Updated : 2 May 2020 6:58 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top