लॉकडाऊन: तुमचं कुटुंब तुमच्याशिवाय जगायला शिकलंय का?
X
या lockdown च्या सुरवातीला बरेच messages फिरत होते ज्यांचा आशय साधारणतः असा होता – “जगाला एका break ची किंवा सुट्टीची गरज आहे”, “पंधरा-वीस दिवस आराम करूया, कुटुंबासोबत व मुलांसोबत वेळ घालवूया”, “पुस्तके वाचूया, नवीन काहीतरी शिकूया”, इ.
हे ही वाचा...
मग Lockdown ची सुरवात झाली. काही लोक स्वेच्छेने तर बरेचसे लोक नाइलाजाने स्वत:च्या घरात रहायला लागले. कुटुंबीयांसोबत वेळ घालवायला लागले, आणि मग या काळात त्यापैकी काही जणांना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील – आपण काय miss करत होतो, आपण एकमेकांपासून किती दूर गेलेलो आहोत किंवा Disconnected झालेलो आहोत, आपल्या सोबतच्या लोकांच्या सवयी आणि Priorities किती बदललेल्या आहेत, आणि त्यांनी कसं आपल्याशिवाय व आपल्याला वगळून जगायला शिकलं आहे. ज्या कोणाच्या बाबतीत हे घडत असेल त्यांची अवस्था खूप वाईट असेल. त्यापैकी बऱ्याच जणांना तर फक्त कुटुंबियांना चांगलं आयुष्य जगता यावं म्हणूनच त्यांच्यापासून दूर रहावं लागलं असेल आणि आज ते तसं चांगलं आयुष्य जगतही असतील पण ते त्यांच्याशिवाय.
असचं कदाचित काही मंडळी निवृत्त होते तेव्हा त्यांनाही लक्षात येत असेल, आलं असेल. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते, प्रयत्न करूनही फार काही बदलता येत नसतं आणि आपल्याच माणसांनी, आपण जिवंत असतानाच, आपल्याशिवाय जगायला शिकलेलं असत...
या निमित्ताने काहीसा असाच संदर्भ असलेला click नावाचा एक English cinema मला आठवतो आहे. तो परत एकदा पाहील.
पण ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर बदलावं, स्वत:ला बदलण्याचा, आपल्या जवळच्या माणसांना वेळ देण्याचा, त्यांच्या सोबत वेळ घालवण्याचा, त्यांचं ऐकण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांच्या सोबत खेळण्याचा, त्यांच्या सोबत फिरण्याचा, त्यांच्या सोबत घरी राहण्याचा, त्यांच्या आयुष्यात सहभागी होण्याचा, त्यांना समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. तसं केलं तर सहजीवन शक्य, सुसह्य, आणि कदाचित आनंदीही होईल. किमान मी तरी तसं करण्याचं, जाणीवपूर्वक करण्याचं, ठरवलं आहे.
पण आता मात्र messages चा आशय बदललेला आहे.