तपस्वीचा मुलींना स्वयंनिर्भय बनविण्यासाठी लागतोय हातभार
Max Woman | 18 Jun 2019 10:47 AM IST
X
X
आजच्या युगात महिलांसाठी स्व-संरक्षण ही काळाची गरज आहे.कित्येक खेड्यात,पाड्यात याविषयी जनजागृती झालेली नाही. पण हीच आजची गरज आहे हे लक्षात घेऊन तपस्वी गोंधळी हिने मुलींना स्व-संरक्षणाविषयी धडे देऊन सक्षम करण्याचा ध्यास घेतला आहे.
तपस्वी हिला लहानपणापासून खेळाची प्रचंड आवड.शाळेतील सर्व खेळांमध्ये आघाडीवर असायची. तिने आठवीला असताना कराटेला जाण्याचा वडिलांकडे हट्ट केला. कराटेला गेल्यावर तिला मेडल विषयी एक क्रेझ निर्माण झाली.त्याचबरोबर मुलगी असून एवढी मेडल मिळावते त्याविषयी आजूबाजूच्या लोकांमध्ये चर्चा रंगत असे.परंतु तिने धाडसाने यावर मात करत कराटे मध्ये तालुका आणि जिल्हास्तरीय नाहीतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल जिंकून दाखवले. साधारण २००६ मध्ये तपस्वीची महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत स्वयंसिध्दा प्रशिक्षण म्हणून निवड झाली. जिल्हा कार्यलयाच्या वतीने तिला विचारण्यात आले.पुढे तिने बालवाडी येथे जाऊन प्रशिक्षण देखील घेतले.प्रशिक्षणाअंतर्गत तिने पक्क ठरवलं की आपल्या आसपासच्या परिसरात असणाऱ्या मुलींना स्व-संरक्षणाविषयी धडे द्यायचे.
तिने जवळजवळ १९,००० मुलींना याविषयी मार्गदर्शन केले आहे . अजून सातत्याने हे कार्य चालू आहे .तपस्वी औरंगाबाद येथे शिक्षणासाठी गेली असताना.तेथील स्पर्धा परीक्षांचे विश्व पाहिले.आपल्या अलिबाग मधील मुलांना देखील असेच शिक्षण मिळावे यासाठी तिने स्वयंसिध्दा संचलित स्पर्धा विश्व नावाची ॲकॅडमी सुरू केली. या ॲकॅडमी मध्ये असल्यास करणारे जवळपास ५०० विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी आणि विविध पदांवर नियुक्ती झालेत. याशिवाय समाजातील चौकटी वृत्तीवर मात करत पथनाट्य, रक्तदान शिबीर, असे विविध उपक्रम राबवत असते. या सर्व कामांची दाखल शासनाने देऊन तपस्वीला जिल्हा युवा पुरस्कार,राज्य युवा पुरस्कार,राष्ट्रीय युवा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आजची स्त्री धाडसाने ,जिद्दीने कोणतेही काम सहज करू शकते हे तपस्वीने दाखवून दिले आहे .
Updated : 18 Jun 2019 10:47 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire