जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यावरुन रंगोलीला ट्वीटरचा दणका
X
अभिनेत्री कंगणा रणावत ची बहीण रंगोली चंदेल हिला ट्वीटर ने मोठा दणका दिला आहे. कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याप्रकरणी ट्रोल झाल्यानंतर आता पुन्हा ती एका नव्या वादात अडकली आहे. मात्र यावेळी रंगोली चंदेलने सामाजिक जबाबदारीचं भान विसरुन देशात धार्मिक तेढ निर्माण करणार ट्वीट करण्यावरुन हा वाद निर्माण झालाय.
संबंधित बातम्या...
- उद्धव ठाकरेंवर टीकेप्रकरणी कंगणाच्या बहिणीला नेटकऱ्यांनी झोडपले..
- 'मुंबईचं इटली होणार, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज'
याप्रकरणी ट्वीटर इंडीयाने रंगोलीवर कारवाई करताना तीचं ट्वीटर अकाऊंट बंद केलं आहे. सध्या सोशल मीडियावर सीनेकलाकार आणि सामान्य नागरिकांसह तिच्यावर प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशंमुख यांच्याकडे केली जात आहे.
रंगोलीच्या प्रक्षोभक ट्वीटवर अनेकांनी तिच्या मतावर खेद व्यक्त करुन ब्लॉकही केलं होत. अशी जातीय तेढ निर्माण करणारी मत व्यक्त करण्याची ही पहीली वेळ नाही यापुर्वीही तीने अनेकदा अशी वक्तव्य केली आहेत. ट्वीटरने यापुर्वीच रंगोलीला ताकीद दिली होती. परंतू पुन्हा अशी पोस्ट केल्य़ामुळे ट्वीटरने तीचं अकाऊंट सस्पेंड केलं आहे.
आपलं ट्वीटर अकाऊंट ब्लॉक झाल्यानंतर रंगोलीने ट्वीटर वर आगपाखड करताना म्हटलंय की,
“ट्वीटर हे अमेरिकन प्लॅटफोर्म असून ते कशा पद्धतीने पक्षपात करतात हे आपण जाणतो. ट्वीटर भारतविरोधी आहे. तुम्ही हिंदू देवता, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना आतंकी बोलून आनंद मिळवू शकता मात्र, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांवर लिहू शकत नाही. मला माझे विचार आणि दृष्टीकोन अशा पक्षपाती मंचावर व्यक्त करायचे नाहीत. मी ट्वीटर कडे कोणतीही विनंती करणार नाही. मी माझी बहिण कंगणा हिची प्रवक्ता आहे. ती खुप मोठी स्टार आहे. आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचण्यासाठी तिला खुप विकल्प उपल्ब्ध आहेत.”
मंगळवारी मुंबईतील वांद्रे येथे स्थलांतरीत मजूरांनी हजारोंच्या संख्येने जमाव केला होता. या घटनेनंतर रंगोलीने ट्वीटर च्या माध्यामातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
‘मुंबईचं इटली होणार. पुढे आणखी आव्हानं येतील. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे’ असं ट्वीट करुन उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवर एकप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी करणं रंगोलीला चांगलचं महागात पडलं होतं. रंगोलीच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर तीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं. अगदी काही जणांनी तीला आपल्या बहिणीसह युपीला जाऊन भोजपुरी चित्रपटसृष्टीत काम करण्याचा सल्ला दिला.