Home > रिपोर्ट > कंगणा राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा!

कंगणा राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा!

कंगणा राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा!
X

गेल्या काही आठवड्यापासून बॉलीवूड अभीनेत्री कंगणा राणावत आणि शिवसेनेत शाब्दिक वाद सूरू आहे. कंगनाने मुंबईची तूलना पाकव्याप्त काश्मिर सोबत केल्यामुळे सर्वच क्षेत्रातून तीच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. कंगना राणावत आणि संजय राऊत मधे शाब्दिक वाद चांगलाच रंगला आहे. कंगनाने ‘मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबवून दाखवा’ असे थेट आव्हानच दिले. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्याची परिस्थिती पाहाता काही दिवस मुंबईला जाऊ नको असा सल्ला हि अमित शहा देऊ शकले असते. मात्र त्यांनी भारताच्या एका कन्येला दिलेल्या शब्दाचा मान राखला. आमच्या स्वाभीमानाची आणि आत्मसन्मानाची लाज राखली. अशा शब्दांत कंगणाने केंद्रिय गृहमंत्री अमित शहांचे आभार मानले.

Updated : 7 Sept 2020 9:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top