Home > रिपोर्ट > 'कंगना ते रिया'....केंद्रीय महिला आयोगाचा पक्षपात?

'कंगना ते रिया'....केंद्रीय महिला आयोगाचा पक्षपात?

कंगना ते रिया....केंद्रीय महिला आयोगाचा पक्षपात?
X

अभिनेत्री कंगना राणावतने (kangana ranaut) मुंबईची तुलना POK शी केल्या नंतर तिच्यावर सर्वच स्थरांतून टीका होत आहे. कंगना विरोधात शिवसेने आदोलनं केली. शिवसेनेच्या या विरोधा नंतर केद्रीय महिला आयोगाने आमदार प्रताप सरनाईक यांच्या अटकेची मागणी केली. त्याच वेळी अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांनी राज्यातील महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत ट्वीट केलं.

कंगना ट्रोल झाल्यावर महिला सुरक्षा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारं केंद्रीय महिला आयोग व अमृता फडणवीस रिया चक्रवर्ती (riya chakravarti) बाबत मात्र उदासिन दिसतात. सुशांत आत्महत्या प्रकरणात रिया आरोपी असली तरी तिच्यावरील आरोप अजूनही सिध्द झालेले नाहीत. अशा वेळी रियाची मीडिया ट्रायल. अतिशय खालच्या पातळीवर होणारं ट्रोलींग, शिवीगाळ या बाबत मात्र मौन बाळगलेलं दिसतात.

त्यामुळे कंगना व रिया प्रकरणात केंद्रीय महिला आयोग पक्षपात करतय का? असा प्रश्न उभा रहातो. या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांचाशी बोललो असता त्या म्हणाल्या की, “कंगना आणि रिया मध्ये केंद्रीय आयोग पक्षपात करतंय का? यापेक्षा केंद्र सरकार भाजपा शासित राज्य आणि बिगर भाजप शासित राज्य यांना हक्काचा GST परतावा देण्यात पक्षपात करतंय का? मायनस मध्ये गेलेला GDP , बेरोजगारीचा झालेला विस्फोट, भिकेला लागलेली अर्थव्यवस्था हे सध्याच्या वेळेचे महत्वाचे विषय आहेत ना की रिया, सुशांत, कंगना मान्य आहे सुशांतचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्याबद्दल मला नितांत सहानुभूती आहे. परंतु आपल्या प्रायोरिटीज काय असाव्या हे मला महत्वाचे आहे. सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस , CBI करतच आहे ते योग्य तपास करून खरं सत्य बाहेर येईलच परंतु आपली प्राथमिकता काय असावी याबद्दल आपण थोडा विचार करावा असं मला वाटतं.”

“सत्ता असताना भाजप (BJP) नेते मुंबई पोलीसांची प्रत्येकवेळी पाठ थोपटायचे मात्र आता त्याच पोलीसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात भाजप गप्प का?” असा प्रश्न शिवसेना आमदार मनिशा कायंदे यांनी उपस्थित केला आहे.

पुढं बोलताना त्या म्हणाल्या की, “केंद्रीय महिला आयोगाने तर कंगनाची कान उघडणी केली पाहिजे. कारण ती मुंबईसारख्या शहराला POK म्हणते म्हणजे डोकं ठिकाणावर आहे का कंगनाचं? तीने POK मधे एकदा जाऊन बघावं तिथं कसे सैनीक तैनात असतात. त्यामुळे कंगना आणि महिला आयोगाच्या वक्तव्यांमागे करता करवीता कोण आहे हे देखील शोधणं गरजेचं आहे.” अशी प्रतिक्रीया कायंदे यांनी दिली आहे.

तर मनसे नेत्या रुपाली ठोंबरे यांनी “एकेकाळचं महिला आयोग म्हणजे अत्याचार ग्रस्त, पीडीत महिलांना न्याय मिळऊन देणारं व्यासपीठ. परंतू अलिकडच्या काळात मागचे सत्ताधऱी या आयोगाचा राजकारणासाठी वापर करताना दिसतात. रियाची चौकशी सुरु आहे पण तरिही तिला आरोपी करण्यात आलं. त्यावेळी या महिला आयोगाने चकार शब्द काढला नाही. पण तेच एखाद्याला टोमने मारुन उगाच वाद निर्माण करणाऱ्या महिला नेत्याला शिवसेनेच्या नेत्याने समज दिली त्यावर जर महिला आयोग सक्षमतेने पुढं येत असेल तर ते दुर्दैव आहे. म्हणजे महिला आयोगामधे महिला वाटून घेतल्या आहेत का? की असं काही ठरलंय आपण याच महिलांची बाजू घ्या इतर महिलांची बाजू घ्यायची नाही. या मागचे जे बोलवते धनी आहेत त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत.“ असं म्हणलं आहे.

Updated : 8 Sep 2020 4:06 AM GMT
Next Story
Share it
Top