Home > रिपोर्ट > ज्योती कलानी यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला राम राम

ज्योती कलानी यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला राम राम

ज्योती कलानी यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला राम राम
X

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उल्हासनगर मधील आमदार ज्योती कलानी यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामधून पुन्हा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. तेव्हा ज्योती कलानी यांच्या सुनबाई पंचम कलानी या भाजपमधून महापौरपदी निवडून आल्याने, कलानी कुटूंबीय भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगात आली होती.

ज्योती कलानी यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी काही अडचणीमुळे राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला. तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असलो तरी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं देखील कलानी यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, कलानी यांच्या राजीनाम्यानंतर आता उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या महापौर पंचम कलानी या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Updated : 28 Sept 2019 8:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top