Home > रिपोर्ट > सैन्यात सुरू होणार महिला सैनिकांची भरती

सैन्यात सुरू होणार महिला सैनिकांची भरती

सैन्यात सुरू होणार महिला सैनिकांची भरती
X

सैन्यात महिला सैनिकांची पहिली तुकडी मार्च २०२१ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. यावर्षी डिसेंबर मध्ये १०० प्रशिक्षण सुरू होईल. सध्या सैन्यात महिला फक्त इंजीनियरिंग, मेडिकल, कायदेशीर सिग्नल आणि शैक्षणीक खात्यात काम करतात. परंतू आता लष्करी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य दलाच्या लष्करी पोलिस दलात महिली सैनिकांची नेमणूक करण्यात येईल. सैन्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महिलांसाठी प्रशिक्षण कालावधी हा पुरूष सैनिकांसारखाच ६१ आठवड्यांचा असेल. आणि प्रत्येकवर्षी समान संख्यांना प्रशिक्षण देऊन कमीशन देण्यात येईल.

कॉर्प्स ऑफ मिलीट्री पोलीसांमध्ये महिला पोलीस छावणी आणि सैन्याच्या इतर प्रतिष्ठीत भाग संभाळतील आणि त्या वेगवेगळ्या राज्य सरकारच्या तसेच केंद्रातील सिव्हील पोलीसांसोबत देखील काम करतील. या व्यतीरिक्त युद्धकैद्यांना हाताळतील तसेच गुन्ह्याच्या प्रकरणांचीही चौकशी करतील.

Updated : 8 Sept 2019 7:58 PM IST
Next Story
Share it
Top