Home > रिपोर्ट > जेसिका लाल मर्डर केस: दोषी मनु शर्माची तिहार जेलमधून मुक्तता

जेसिका लाल मर्डर केस: दोषी मनु शर्माची तिहार जेलमधून मुक्तता

जेसिका लाल मर्डर केस: दोषी मनु शर्माची तिहार जेलमधून मुक्तता
X

दिल्लीच्या बहुचर्चित जेसिका लाल मर्डर केस (Jesika Lal Murder Case) मधील दोषी मनु शर्मा (Manu Sharma) यास १७ वर्षानंतर मुक्त करण्यात आलं आहे. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी मनु शर्माला मुक्त करण्यासाठी संमती दर्शवली आहे. १९९९ साली मॉडल जेसिका लाल हिच्या हत्येप्रकरणी दोषी आढळल्यानंतर त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

दिल्लीची प्रसिद्ध मॉडल जेसिका लाल हिची २९ एप्रिल १९९९ च्या रात्री रेस्टोरंटमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली होती. जेसिका मनु शर्मा याला दारु देण्यास मनाई केल्यामुळे तिच्यावर गोळी झाडली गेली होती. १७ वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर चांगल्या वर्तवणुकीच्या आधारावर त्याची शिक्षा माफ करण्यात आली आहे.

जेसिका लाल हत्याप्रकरण न्यायालयात सात वर्षांपर्यंत चालल्यानंतर २००६ साली सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं. मनु शर्मा हरियाणाचे नेते विनोद शर्मा यांचा मुलगा असल्यामुळे या प्रकरणात दिरंगाई केल्याचं म्हटलं गेलं. जेसिकाच्या कुटुंबाने हा लढा कायम ठेवला आणि प्रसारमाध्यमांतून ‘नो वन किलड जेसिका’ या मोहिमेतून संपुर्ण देशभरात पोहोचला. पुन्हा या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि फास्ट ट्रॅक कोर्टात केस लढवली गेली. यानंतर न्यायालयाने मनु शर्मा यास दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती.

Updated : 3 Jun 2020 7:41 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top