Home > रिपोर्ट > भारतीयांच्या मीम्सवर ट्रम्प कन्या इवांकाचं प्रतिउत्तर

भारतीयांच्या मीम्सवर ट्रम्प कन्या इवांकाचं प्रतिउत्तर

भारतीयांच्या मीम्सवर ट्रम्प कन्या इवांकाचं प्रतिउत्तर
X

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सहकुटुंब भारत दौरा फारच लक्षणीय ठरला. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, त्यांची मुलगी इवांका आणि जावई जॅरेड कुशनर यांनीही भारत भेटीनंतर मायदेशी परतल्यावर पाहुणचाराचे आभार व्यक्त केले. मात्र, हा दौरा सुरु असताना सोशल मिडीयावर मीम्सचा आणि व्हिडीओंचा इतका पाऊस पडला की अजुनही तो ओसरला नाही. असेच काही मीम्स ट्रम्प कन्या इवांकापर्यंत पोहोचले आहेत. यावर तीने स्वत: रिट्वीट केले आहे.

ट्रम्प कुटुंबाच्या भारत दौऱ्यात इवांकाने ताजमहल समोरील बाकावर आपल्या पतीसोबत फोटो काढला होता. त्यांनंतर अनेकांनी या फोटोमध्ये आपले फोटो एडीट करून मजेदार पोजमध्ये फोटो बनवले. त्यातील काही फोटोवर इवांकाने “मी भारतीय लोकांच्या कळकळीचे कौतुक करते. मी बरेच नवीन मित्र बनवले आहेत.” असं म्हटलं आहे.

विशेष म्हणजे पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांझ यानेही असाच एक फोटो आपल्या ट्वीटर हॅंडलवर ट्वीट केला. यात त्याने म्हटलयं की, “पाठीमागेच लागली होती ताजमहल पाहायला जायचय, मग घेऊन आलो अजून काय करणार”

यावर इवांकानेही “मला नेत्रदीपक असा ताजमहल पाहायला नेल्याबद्दल धन्यवाद दिलजीत दोसांझ. मी हा अनुभव कधीही विसरणार नाही.” असं रिट्वीट केलं आहे. मात्र,यावर तीची नेमकी भावना काय हे काही कळलं नाही.

Updated : 1 March 2020 9:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top