सोनिया गांधींच्या चेहऱ्यावर जखमा असलेले पोस्टर्स इटलीमध्ये
X
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी करीम लाला याला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात जात असत असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला. याचबरोबर इटलीतील मिलान शहराच्या भिंतींवरचे चित्र सध्या चर्चेत आहेत. कारण या भिंतींवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा फोटो आहे. या भिंतींवरचे चित्र इटलीच्या स्ट्रीट आर्टिस्ट अॅलेक्सझांड्रो पालोंबोने यांनी काढले आहे. हे फक्त फोटो नसून या फोटोवर महिलांच्या चेहऱ्यावर जखमा दाखवण्यात आल्या आहेत. सोनिया गांधी यांच्याबरोबर जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल, मिशेल ओबामा, हिलरी क्लिंटन देखील आहेत. म्यानमारच्या नोबल पुरस्कार विजेत्या ऑन्ग सान सू यांसारख्या शक्तीशाली महिलांच्या चेहऱ्यावर जखमा असलेले फोटो या भिंतींवरती आहेत. हे फोटो काढण्यामागचे कारण महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज त्यांनी या चित्रामधून साखरलेलं आहे. त्याचबरोबर या पोस्टर्सवर महिलांच्या जखमी चेहऱ्यांसोबत वेगवेगळे संदेशही लिहिण्यात आले आहेत.जगभरात महिलांसोबत घडणाऱ्य़ा घटना आर्टिस्ट अॅलेक्सझांड्रो पालोंबोने यांनी आपल्या कलाकृतीतून मांडलं आहे.यासर्व फोटोनां ‘Just Because I am a Woman’ म्हणजेच ‘कारण मी एक स्त्री आहे’, असं नाव दिलं आहे.
https://twitter.com/PalomboArtist/status/1217852238456147979?s=20
https://www.instagram.com/p/B7Vr91DBg3k/?utm_source=ig_embed