Home > Max Woman Blog > वांझ स्त्री आणि समाज

वांझ स्त्री आणि समाज

वांझ स्त्री आणि समाज
X

वांझ निपुत्री,वशाला दिवा नाही,ववशं खंड हाय हिचा ,अग हाय का तुह्या ववशाला दिवा?तोहं घरदार वस पडलं ना!तोंड पाहु नये पांढरतोडीचं,पांढरी पाल लेकरूबाळ नसणारणीला कदर नसती लेकरायची,मानपान कशाला द्यायचा? वटी भरायला तिला कशाला बोलवितात?अन ती जर आली तर मंग आम्ही नाहीत माय यायचो! सकाळी सकाळी वांझ बाईचं तोंड बघीतलं की दस बरकता येत नाही,वांझ बाईच्या भुजाला लेकुरवाळीचा भुज (खांद्याला खांदा)कधीच लागु द्यायचा नाही,वांझ बाईच्या पदराला पदर लागु दयायचा नाही,

हे शब्द हे वाक्य आपण हमखास ऐकलेले असतात तशी वांझ या शब्दाची ओळख प्रशिक्षण हे नांदायला आलेल्या नव्या नवरीला आणि गरोदर असणार्या स्त्रिंयाना खासकरून दिले जाते आज वांझोटी वांझ या शब्दाबद्दल जाणिवपुर्वक मुलबाळ नसलेल्या स्त्रियांना मी भेटुन फोनवर चर्चा केली तेव्हा समाजात शेजारी इणि खिसकरून नातेवाईक जवळची माणसं असं बोलतात हे सांगितले.यामुळे अपमान वाटतो जीव खसुन जातो तोंड दाखवू वाटत नाही चांगल्या बायांना,लोकांचे लेकरं बघुन जीव झुरतो एखाद्याच्या लेकराला कडेवर घ्यावंसं वाटलं खेळवावं वाटलं खाऊ द्यावासा वाटला तर नाही हे करता येत,कठल्या जन्मीचं पाप केलं असे सतत विचार मनात येऊन जातात.या अशा महिला स्वतः हुन कुणाला तोंड दाखवत नसताना बघीतल्या आहेत ज्या महिलेची कुस वांझ असते तिला सन्मानाने बघीतलं जात नाही.घरात सासु सासरे पदोपदी टोमणे मारत असतात त्रास देत असतात असं या महिला सांगत होत्या.

वांझ म्हणजे बंजर,नापीक ओसाड जमीन मुल्यहीन या अर्थाने वापरला जाणारा हा शब्द नापीक जमीनीला कमी पण मुलबाळ नसलेल्या स्त्रियांच्या बाबतीत व्यावहारिक भाषेत सतत बोलला जातो त्यांच्या भांडणात तर त्याच शब्दावरुन भांंडण सुरू होऊन त्याच शब्दावर भांडण संपत असते.किती सहज बोलतो आपण मुलबाळ नसलेल्या स्त्री ला वांझ?एखाद्या दलित समाजातील व्यक्तीना जातिवाचक बोललं तर गंभीर स्वरूपाचा गुन्हा समजून आरोपीवर गुन्हा दाखल केला जातो मग अशा स्त्रियांना नावं ठेवणार्या लोकांवर का होऊ नये एखादा गुन्हा दाखल?

स्त्री जन्माला आली म्हणजे तिने मुलं जन्माला घातलीच पाहीजेत का?का जबरदस्ती आहे मुलं जन्माला घालण्याची तिच्यावर? आज ही अशा हजारो महिला आपल्या आसपास आहेत ज्या आपल्या नवर्याचं नंपुसकत्व झाकुन ठेवत स्वतः वांझपणाचं ओझं स्वतः वहात रहातात.आज ही खुप सारे पुरुष आपलं नंपुसकत्व उघड होऊ नये म्हणुन जबरदस्ती करतात.बायकोच्या मांड्यांना बिड्याचे सिगारेटचे चटके देतात,तिच्या डोक्यातील भांगावरील केस उपटतात की तिने कुठल्या पुरुषांकडे बघु नये.ह्या मुलबाळ नसलेल्या स्त्रिया कोणी आपलं तोंड बघु नये म्हणुन सकाळी सूर्यप्रकाशाकडे पाठ फिरवताना,बाजेवर बसलेल्या असताना खाली घोन (मान)घालून बसलेल्या मी स्वतः अनभवलं आहे.

अशा नंपुसक पुरुषांना एवढी अवहेलना नाही सहन करावी लागत जेवढी मूलबाळ नसलेल्या स्त्रीला वांझ म्हणुन सहन करावी लागते किती सहज बोलतोय आपण त्यांना वांझ? किती सहज दुखावतोय भावना त्यांच्या? कधी विचार केलाय का आपण की,एखाद्या शेजार्याच्या घरी लहान लेकराचं बारसं सुरू आहे आणि आपण आपल्या शेजारी रहाणार्या त्या वांझ बाईला कार्यक्रम ाला बोलवत नाहीत, एखाद्याचं गब्दुलं (बाळसेदार)बाळ तिला घ्यावं वाटतं पण त्याला तिची नजर लागु नये म्हणुन तिच्या मांडीवर दखेळायला जेव्हा आपण देत नाही तेव्हा तिला काय वाटत असेल? एखाद्या गरोदर स्त्री चा वटीभरणाचा(डोहाळेजेवण) कार्यक्रम असतो आणि आपण त्या वांझ स्त्रीला त्या कार्यक्रमाला आपण बोलवत नाहीत किती वेदनादायक ते क्षण ती अनुभवत असेल याची कल्पना करतो का कधी?वांझ म्हणतो आपण त्यांना पण त्या वांझ नाहीत,वांझ तर तुम्ही ते सर्व जण आहात ज्याच्यातील

माणुसकी संपलेली आहे,ज्यांनी या स्त्रियांचं माणुसपण हिरावून घेत त्यांच्या भावनांशी त्यांच्या आत्मसन्मानाशी वांझोटा खेळ खेळता!!

कुठपर्यंत आपण तिला

तिची कुस वांझोटी

तिची वटी वांझोटी

जिला नाही मुलबाळ

तिला नाही मानपान

जिची पडीक जमीन

तिला नाही सन्मान

जिच्या अंगणात नाही

नाद मनगट्या वाळ्याचा

तिचा जीव झुरतो रोज

ऐकुन शब्दांच्या मार्याचा

कुठवर बाई तिने

असं दुःख भोगावं ?

वांझ नवरा ही असतो

तिने कधी जगाला सांगावं?

तिच्या माणुसपणाची ती धनी

तिचे स्त्रित्व विचारणारे तुम्ही कोण रे पागंडी???

-सत्यभामा सौंदरमल

Updated : 26 Dec 2019 11:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top