भारतीय राजकारण बदलतंय!
X
25 व्या वर्षात आपण इथे सोशल मीडियावर फक्त गप्पा हाणत बसलोय.. आणि तिने संपूर्ण तरुण भारतीय पिढीसमोर आदर्श निर्माण करत सर्वात तरुण खासदार म्हणून एक नवा इतिहास रचला आहे.
होय, अनंत नायक या भाजपकडून सलग 2 वेळा निवडून आलेल्या खासदारास कांटे की टक्कर देत निवडून आलेली बी.टेक इंजिनिअर असलेली ही आहे चंद्राणी मुरमू.
काहीतरी करून दाखवण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि अट्टहास असणाऱ्यांसाठी वयोमर्यादा आणि वाटेत येणारे अडथळे बोटावर मोजण्याचा विषय असतो, हे चंद्राणीने सिद्ध करून दाखवलं.
क्योंझर मतदारसंघात बिजू जनता दल(BJD) या पक्षातून लढणाऱ्या चंद्राणीची ही लढत अजिबात नियोजित नव्हती. ती नोकरी शोधत होती आणि तिच्या काकांनी म्हणजेच हारमोहन सोरेन यांनी तिला लोकसभा निवडणूक लढण्यास प्रवृत्त केलं. चंद्राणी विरोधात विरोधी पक्षांनी अनेक षडयंत्र रचली.. पण त्या षड्यंत्रांना खोडून काढत लोकांनी त्यांच्या प्रेमाचा कौल चंद्राणीच्या बाजूने दिला.
कधी स्वप्नातही विचार न केलेली पहिली गोष्ट तिला मिळाली ती म्हणजे, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना समोरून भेटण्याची सुवर्ण संधी !
यापूर्वी वेळेअभावी मतदारसंघ आणि तेथील लोकांत जाऊन त्यांच्याशी चर्चा साधण्याची संधी न मिळाल्याने चंद्राणीचं पहिलं ध्येय लोकांमध्ये जाऊन त्यांना वेळ देणं हे आहे. तसंच, राजकारणात आल्यावर होणारं चारित्र्यहनन जनतेसाठी खरंच काहीतरी करू इच्छिणाऱ्या बऱ्याच जणांना मागे घेऊन जातं. म्हणूनच, चंद्राणी सांगते की, राजकारण करा पण कामाच्या जोरावर नाही की चारित्र्याच्या आधारावर !
महिलांसाठी आणि तरुणांसाठी शिक्षणाचे दालन नव्याने विस्तारणे, वाहूतुकीच्या सोयीसुविधा सुधारणं, नोकरी-व्यवसायाच्या असंख्य संधी प्रत्येक लोकांसाठी उपलब्ध करून देणं हेच चंद्राणीचं मुख्य उद्दिष्ट आहे.
आपण नेहमी तक्रार करतो की संसद म्हातारी आहे, तेथे तरुणांनी प्रवेश केला पाहिजे, पण एकीकडे असाही सूर उमटतो की तरुणांना राजकारणात भविष्य नाही...पण या निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी वेगळं आणि आशादायक चित्र पाहायला मिळालं! देशभरातील जनतेने पक्ष वगैरे न पाहता नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देत भारतीय राजकारणात सकारात्मक बदलाचे वारे वाहू लागल्याचे जणू संकेतच दिले आहेत!
- प्रतिक्षा मोरे यांनी ही पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे.