जागतिक कोरोनाबाधीत देशांच्या यादीत भारत सातवा
X
कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या देशात वाढत चालली असली तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही मे महिन्यात तब्बल ४८.७६ टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे. मार्चमध्ये हे प्रमाण ७.१ टक्के होते ते आता ४७ टक्क्यांवर आले आहे.
गेल्या २४ तासात देशात ४ हजार ६१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, गेल्या २४ तासात ८३४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. १९३ मृत्यू देखील झाले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८६ हजार ९८३ झाली आहे. तर एक्टिव्ह रुग्णांची संख्या ८९ हजार ९९५ एवढी आहे.
कोरोनाचा प्रदुर्भाव सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत भारत आता ७ व्या स्थानावर पोहोचला असल्याचं WHO च्या आकडेवारीनुसार स्पष्ट झालं आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, इंग्लंड, स्पेन आणि इटलीनंतर भारताचा या यादीत क्रमांक लागतो.
दरम्यान, देशभरात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात बऱ्याच बंधनांवर शिथिलता आणण्यात आल्या असून उद्योगधंदे, लहान दुकाने, प्रार्थनास्थळे अशा सार्वजनिक ठिकाणांवरील बंदी उठवण्यात आली आहे.