Home > रिपोर्ट > 'वसतिगृहात अत्याचाराच्या वाढत्या घटनेमुळे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमी होईल'  

'वसतिगृहात अत्याचाराच्या वाढत्या घटनेमुळे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमी होईल'  

वसतिगृहात अत्याचाराच्या वाढत्या घटनेमुळे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमी होईल  
X

काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील इंफॅन्ट जीजस सोसायटीच्या 7 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता. पीडित मुलींनी तक्रार दिल्यानंतर सर्व दोषींना अटकही झाली. शिक्षणाचे माहेर घर असलेल्या वसतिगृहात तेही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मुलींवर अत्याचार झाला असताना मॅक्सवुमनने राज्यातली महिला वसतिगृह असुरक्षित होत असल्याची बातमी दिली होती. ही अत्याचाराची बातमी समजताच माहेर संस्थेच्या पदाधिकारी त्या वसतिगृहात जाऊन आल्या. तसेच त्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात आरोपींना कडक कारवाई करावी, अशी मागणी केलेली आहे.गरीब, अनाथ, आदिवासी मुलींचे शिक्षणाचे प्रमाण आधीच कमी, त्यात असे प्रकार झाले तर मुलीच्या शिक्षणाचे गळतीचे प्रमाण आणखी वाढेल. असे होता काम नये. असुरक्षित वातावरण असेल तर त्यांच्या शिक्षणाचे काय होणार? अशी काळजी माहेर संस्थेच्या अध्यक्ष अरुणा सबाने यांनी व्यक्त केली.

Updated : 23 April 2019 9:53 AM IST
Next Story
Share it
Top