Home > रिपोर्ट > लॉकडाऊन मध्ये अस्मिता योजनेअंतर्गत उपलब्ध करावेत 'सॅनिटरी पॅड' 

लॉकडाऊन मध्ये अस्मिता योजनेअंतर्गत उपलब्ध करावेत 'सॅनिटरी पॅड' 

लॉकडाऊन मध्ये अस्मिता योजनेअंतर्गत उपलब्ध करावेत सॅनिटरी पॅड 
X

महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या महामारीत (CoronaVirus) संसर्ग वाढू नये यासाठी ३१ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे. प्रत्येक महिला व युवतींना बाहेर पडणे शक्य होत नाही. मेडिकल हे अत्यावश्यक सुविधांमध्ये मोडत असले तरी मेडिकल्स वर होणारी गर्दी पाहता अनेक गैरसमजुतीतून महिला खरेदीसाठी जात नाहीत. थोडया प्रमाणात अशिक्षित असल्याचा प्रभाव ही जाणवतो अशात मासिक पाळीच्या समस्या या प्रत्येक महिन्यांच्याच सॅनेटरी पॅड (Sanitary Pad) चा वापर न केल्यास या लॉकडाऊनच्या काळात आरोग्य विषयक समस्या होऊ शकतात.

मागील काळात आम्ही महिलांनी आणि युवतींनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या आदेशानुसार अस्मिता योजना यशस्वी केली होती. ही योजना पुन्हा राबवण्यात यावी तसेच कोरोनाच्या महामारीत राज्तीयातील महिलांना आरोग्य सेविकांच्या मार्फत महिला व बालविकास विभागाकडून घरोघरी सॅनिटरी पॅड उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी नगरसेविका रीमा पवार यांनी केली आहे.

सध्या लॉकडाऊन असल्याने प्रत्यक्षात निवेदन न देता सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंख्यमंत्री उद्वव ठाकरे (Uddhav Thackeray), महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikawad), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), पंकजा मुंडे, राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी नंदुरबार यांना समाजमाध्यमातून संदेश देत निवेदनासह मागणी केली आहे.

Updated : 13 April 2020 3:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top