Home > रिपोर्ट > हैदराबाद एन्काऊंटर: याआधी देखील त्यांनी ९ महिलांना जाळलं होतं!

हैदराबाद एन्काऊंटर: याआधी देखील त्यांनी ९ महिलांना जाळलं होतं!

हैदराबाद एन्काऊंटर: याआधी देखील त्यांनी ९ महिलांना जाळलं होतं!
X

'हैदराबादेतील महिला डॉक्टर हिच्यावर बलात्कार करून तिला मारणाऱ्या नराधमांनी त्याआधी नऊ महिलांवर अत्याचार करून त्यांना जाळून मारलं होतं,' अशी माहिती पुढे आली आहे. हैदराबादमध्ये एन्काऊंटर झालेल्या 4 आरोपींपैकी दोघांवर यापूर्वी 9 महिलांसोबत बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं 'टाइम्स ऑफ इंडिया'ला ही माहिती दिली आहे. 'आम्ही कर्नाटक व तेलंगण हायवेवर झालेल्या बलात्कार व हत्येच्या १५ घटनांसदर्भात त्यांची चौकशी सुरू केली असून 15 पैकी 9 घटनांमध्ये यातील दोघा आरोपींचा समावेश असल्याचं त्यांनी कबूल केलं होतं. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम तपासासाठी घटनास्थळी पाठविण्यात आले आहे असंही त्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

Updated : 18 Dec 2019 3:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top