Home > रिपोर्ट > डाॅ. प्रियांका रेड्डीसोबत घडलेल्या घटनेनं देशभरात प्रचंड संताप

डाॅ. प्रियांका रेड्डीसोबत घडलेल्या घटनेनं देशभरात प्रचंड संताप

डाॅ. प्रियांका रेड्डीसोबत घडलेल्या घटनेनं देशभरात प्रचंड संताप
X

प्रियांका रेड्डी मर्डर अँड सस्पेक्टेड रेप केस, @ हैदराबाद आपल्या गाडीची स्टेपनी नसेल तर काय करायला हवं, कुणावर विश्वास ठेवायला हवा? दुचाकी चालवणाऱ्या स्त्रियांनी काही मूलभूत वाहन कौशल्ये आत्मसात करायला हवीतच.भवतालची गॅरेज बंद असताना लिफ्ट देतो म्हणणाऱ्या वा गाडी कॅरी करून दुसऱ्या गॅरेजकडे नेतो म्हणणाऱ्या अनोळखी पुरुषांतून चांगला, वाईट पुरुष कसा ओळखायचा?नजर आणि देहबोली यावरून माणसं ओळखता येतात. पण आपण घाबरून गेलेलो असलो की आपले अंदाज बिघडतात.

प्रियांकाचं हेच झालं.

तरुण प्रियांका पशुवैद्यकीय डॉक्टर होती.हैदराबाद बाहेरील शादनगर परिसरामध्ये प्रियांकाची स्कुटी पंक्चर झाली होती. त्यानंतर तिने तिच्या बहिणीला फोन केला. रात्री सव्वा नऊच्या सुमारास तिने फोन करुन स्कुटी पंक्चर झाल्याचे सांगितले. तसेच एका व्यक्तीने तिला जवळच्या गॅरेजपर्यंत लिफ्ट देतो असंही सांगितल्याचंही तिने फोनवरील संभाषणादरम्यान सांगितलं. तसेच ज्या ठिकाणी गाडी बंद पडली ते ठिकाण निर्जन होते. प्रियांकाने बहिणीशी बोलताना आपल्याला येथे भिती वाटत असून इथे अनेक अनोखळी पुरुष असून मोठ्या प्रमाणात ट्रकही उभे असल्याचे सांगितले होते. त्यावेळी बहिणीने तिला गाडी तिथेच सोडून जवळच्या टोलनाक्यापर्यंत चालत जाण्यास सांगितले.सकाळी प्रियांकाची गाडी जिथं आढळली तिथे दारूची बाटली देखील सापडली.खून करून प्रियांकाचा मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. गळ्यातील लॉकेटवरून तिची ओळख पटवण्यात आली.घटनास्थळापासून काही अंतरावर प्रियांकाची अंतर्वस्त्रे सापडल्याने तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या झाली असावी असा कयास बांधला जात आहे. हे सामूहिक बलात्काराचे प्रकरणही असू शकते.अत्यंत क्रूर, पाशवी घटना आहे ही. पूर्वनियोजित देखील असू शकते.

प्रियांकाची गाडी जिथं सापडली तो मुस्लिमबहुल इलाखा असल्याने काहींनी यात आपली विष्ठा आणि धर्मनिष्ठा मिसळत आपले रंग उधळायला सुरुवात केलीय.

जर कुणी जाणीवपूर्वक जात धर्म हेरून अशा घटना करत असेल तर त्या विकृताच्या मागची सडकी डोकी ठेचली पाहिजेत. दोषी कोणीही असॊत त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी.

त्याचवेळी एकट्याने दुचाकी चालवत दूरच्या अंतरावरील कामास जाणाऱ्या स्त्रियांनीही योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे आणि तत्सम कौशल्य आत्मसात केलं पाहिजे हे ही खरे !

- समीर गायकवाड

Updated : 30 Nov 2019 10:32 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top