CoronaVirusUpdate: बाधितांच्या संख्येत चिंताजनक वाढ, 'ही' आहे आजची रुग्णसंख्या
X
सांगली जिल्ह्यातील एकाच कुंटुबातील 5 व्यक्तींना कोरोना झाल्याचं समोर आल्यानंतर राज्यातील कोराना बाधीत रुग्णांची संख्या 116 होती. मात्र, आता त्याच कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील कोराना (Corona Virus) ची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता हा आकडा 122 वर गेला आहे. राज्याभरातील नागरिकांना सतत सरकारकडून घरात राहण्याची #StayAtHomeSaveLives विनंती केली जातेय.
- कोरोना: संकट नव्हे संधी !
- Coronavirus : 'त्या' कुटुंबातील 9 लोकांना कोरोना ची लागण
- Corona Virus च्या संकटात का होतोय '#काय_सांगशील_ ज्ञानदा?' ट्रेंड व्हायरल
सकाळी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल आता पॉझिटिव्ह आले आहेत. या अहवालानंतर ते कोणाच्या संपर्कात होते. याची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळं आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर भागात कोराना चे रुग्ण वाढू देखील शकतात. या संदर्भात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी त्यांच्याशी संपर्क आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती घेत असल्याचं माध्यमांना सांगितलं.
आत्ता आलेल्या तपासणी अहवाला नुसार दोन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मुलगी असा समावेश आहे. एकूण 4 पुरुष, 4 महिला आणि 1 लहान मुलगी असे आत्ता पर्यंत 9 जण इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील आहेत.
तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण आहेत?
मुंबई शहर आणि उपनगर – 51 राज्यातील सर्वात मोठी संख्या आहे. त्यानंतर पुणे महानगरपालिका परिक्षेत्रात 19, पिंपरी चिंचवड महानगर पालिका 12, नवी मुंबई 5, कल्याण 5, नागपूर 4, यवतमाळ 4, सांगली 9, अहमदनगर 3, ठाणे 3, सातारा 2, पनवेल 1, उल्हासनगर 1, औरंगाबाद 1, रत्नागिरी 1, वसई विरार 1
देशात किती रुग्ण?
देशात कोरोना ची संख्या ६०६च्यावर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या आतापर्यंत १० झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात २४ मार्च रोजी कोरोना रुग्णांची संख्या ५२९ होती ती २५ मार्च रोजी वाढून ६०६ झाली आहे. देशभरात कोरोना व्हायरस ला रोखण्यासाठी #FightagainstCoronavirus लॉकडाऊन करण्यात आल असतानाही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे या आकड्यात सतत वाढ होते आहे.
कोरोनाचा कहर – जागतिक परिस्थिती
१. कोरोनाचे एकूण रुग्ण – ४ लाख १६ हजार ४८६
२. कोरोनामुळे १८ हजार ५८९ लोकांचा मृत्यू
३. जगातील १९६ देशांमध्ये कोरोनाचा फैलाव
४. कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत ४२ व्या क्रमांकावर