Home > रिपोर्ट > कोरोनाची जागतिक रुग्णसंख्या 52 लाखाच्या पार, भारत ११ व्या स्थानी

कोरोनाची जागतिक रुग्णसंख्या 52 लाखाच्या पार, भारत ११ व्या स्थानी

कोरोनाची जागतिक रुग्णसंख्या 52 लाखाच्या पार, भारत ११ व्या स्थानी
X

संपूर्ण जगात कोरोनाचा कहर सुरूच असून आता कोरोनाच्या जागतिक रुग्णांची संख्या 52 लाखांच्यावर गेली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 37 हजार 572 झाली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण जगात आतापर्यंत 20 लाख 54 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हे ही वाचा...

तर अमेरिकेतील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 16 लाखांवर गेली असून आतापर्यंत 95 हजार 921 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत साडे तीन लाखांच्यावर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आता सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आला असून रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सध्या रुग्ण संख्येच्या बाबतीत भारताचा क्रमांक 11 वा आहे.

Updated : 23 May 2020 12:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top