अवकाळी पावसामुळे शेतकरी अधिक अडचणीत सुप्रिया सुळेंनी केली चिंता व्यक्त
X
रविवारी झालेल्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडापाशी आलेल्या पिकाचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांना पत्र लिहिलं आहे.
रविवारी पाऊस, वारा यामुळे बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यातील व खडकवासला ग्रामीण भागातील ज्वारी, बाजरी व ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
कोरोनाचे संकट आणि शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी उद्धस्त झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, त्याचप्रमाणे फळपिकांचे पीक विमा असलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारे केली आहे.
बारामती लोकसभा क्षेत्र व परिसरात दि.६ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.दौंड, इंदापूर, खडकवासला,पुरंदर व बारामती या तालुक्यांमध्ये ज्वारी,बाजरी,ऊस आदी या पिकांचे मोठे नुकसान झाले.अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे अडचणीतील शेतकरी यामुळे अधिक अडचणीत आला. pic.twitter.com/LshLgORwEf
— Supriya Sule (@supriya_sule) September 9, 2020